हिंदुस्थानी पुरुष संघाच्या इंग्लंड दौऱ्याची चर्चा सुरूच असतानाच हिंदुस्थानच्या महिला संघाची इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. महिला संघ इंग्लड दौऱ्यादरम्यान पाच टी-20 सामन्यांची, तर 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांच्या जागी संघात कोणाला संधी द्यावी? कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवावी? याचा विचारविनिमय केला जात आहे. त्यामुळे संघ जाहीर होण्यास उशीर होत असून 23 मेपर्यंत टीम इंडियाचा संघ जाहीर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे टीम इंडियाच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. हिंदुस्थानचा महिला संघ 28 जून ते 22 जुलैदरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी-20 मालिकेला 28 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर, पहिला एकदिवसीय सामना 16 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल.
इंग्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानी महिला संघ
एकदिवसीय संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योति कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे.
टी 20 युनियन हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटिया, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे.
इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
टी-20 मालिका
पहिला सामना – 28 जून (संध्याकाळी 7 वाजता)
दुसरा सामना – 1 जुलै (रात्री 11 वाजता)
तिसरा सामना – 4 जुलै (रात्री 11.05 वाजता)
चौथा सामना – 9 जुलै (रात्री 11 वाजता)
पाचवा सामना – 12 जुलै (रात्री 11.05 वाजता)
एक दिवस मलिका
पहिला सामना – 16 जुलै (सायं. 5.30 वाजता)
दुसरा सामना – 19 जुलै (दुपारी 3.30 वाजता)
तिसरा सामना – 22 जुलै (सायं. 5.30 वाजता)