बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच त्याचा सितारे जमीन पर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आमिर त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'मुळे चांगलाच चर्चेत आहे. यावर्षी वाढदिवसाला आमिर खानने त्याच्या नवीन गर्लफ्रेंडची ओळख करून दिली. आमिर सध्या गौरी स्प्रॅटला (Gauri Spratt) डेट करत आहे. गौरी आणि आमिर खान अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत.
सध्या आणि गौरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गौरी बाहेर आमिर खानची वाट पाहताना दिसत आहे. गौरी एअरपोर्टवर आमिर खानला घ्यायला पोहचली होती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आमिर खानने जांभळ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता आणि निळ्या रंगाची धोती परिधान केली आहे. त्याच्या हातात एक पुस्तक देखील आहे. त्याचा हा एअरपोर्ट लूक खूपच व्हायरल होत आहे.
एअरपोर्ट बाहेर गाडीमध्ये आमिर खानची वाट पाहत आहे. त्यानंतर आमिर खान गाडीमध्ये बसतो आणि त निघून जातात. त्यानंतर गाडीत दोघे एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबई विमानताळाबाहेरचा आहे. गौरी स्प्रॅट ही बंगळुरूची रहिवासी आहे. ती आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली काम करते. गौरी स्प्रंटला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे.
'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia ) देखील झळकणार आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.