शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांच्या ‘हेल टू हेव्हन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज 17 मे रोजी आयोजित केला होता. या पुस्तकात ईडीच्या कारवाया, सरकारच्या धमक्या, ईडी आणि सीबीआयच्या नोटिसा अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. ‘हेल टू हेव्हन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ संगीतकार जावेद अख्तर देखील उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानवर पुन्हा निशाणा साधला आहे.
संजय राऊतांबद्दल काय म्हणाले?
जावेद अख्तर संजय राऊत यांच्याविषयी बोलताने म्हणाले, ‘ते टी 20 चे खेळाडू आहेत. ते चौकार आणि षटकारच मारतात. ते घाबरतही नाही. पण ते चेंडू स्टेडियम बाहेरच टोलवत असतात. माझा त्यांच्याशी कसा परिचय झाला आणि चांगले संबंध झाले ते सांगतो. प्रत्येक लोकशाहीत प्रत्येक पक्षाची गरज असते. निवडणुकीची गरज असते. झालीस तर ईमानदार मीडियाचीही गरज असते. त्याच प्रकारे असे नागरिकही असावेत की जे कोणत्याच पक्षाचे नसावे. त्यांना जे चांगलं वाटलं ते बोलावं. जे वाईट वाटतं ते बोलावं. मी त्यापैकी एकच आहे. तुम्ही एकतरफी बोललातर एकाच पद्धतीच्या लोकांना खूश कराल. तुम्ही अधिक बोललला तर सर्व लोकांना खूश करणार.’
‘पाकिस्तान ऐवजी नरकात जाणं पसंत करेन’
पुढे ते म्हणाले, ‘माझं ट्विट पाहा भरपूर शिव्या पाडतात. असं नाही की काही लोक माझं कौतुकही करतात. काही लोक म्हणतात तू काफीर आहे. नरकात जाल. काही लोक म्हणतात जिहादी तू पाकिस्तानात जा. माझ्याकडे पाकिस्तान किंवा नरकात जायची चॉईस असेल तर मी नरकातच जायचं पसंत करेल.’