नागास्त्र ड्रोनचा ऑपरेशन सिंदूरमध्ये वापर,अपडेट समोर येताच ड्रोन कंपनीचा स्टॉक बनला रॉकेट
Marathi May 17, 2025 11:25 PM

ऑपरेशन सिंडूर मुंबई :  जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारतानं या दहशतवादी हल्ल्याचा बदला 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत घेतला. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करत ते उद्धवस्त करण्यात आले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी बिथरलेल्या पाकिस्ताननं चीन आणि तुर्कीच्या ड्रोन आणि मिसाईलचा वापर करत भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भारताच्या अभेद्य लष्करी सामर्थ्यापुढं यश आलं नाही.  भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूर वेळी नागास्त्र ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती समोर येताच नागास्त्र ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. नागास्त्र ड्रोन सोलर इंडस्ट्रीज आणि झेड मोशन या कंपनीकडून बनवला जातो.

16 मे रोजी सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअरमध्ये शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली. एका दिवसात शेअरमध्ये 170 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा स्टॉक 14070 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसात 6.66 टक्के रिटर्न सोलर इंडस्ट्रीजच्या शेअरनं दिली आहेत.  गेल्या पाच दिवसात शेअरमध्ये 878 रुपयांची तेजी आली आहे.

नागास्त्र ड्रोनची वैशिष्ट्ये

नागास्त्र ‘मेड इन इंडिया’ मॅन-पोर्टेबल सुसाइड ड्रोन आहे.  सीमेवरुन घुसखोरी करुन दहशतवाद्यांना निशाना करण्यामध्ये हा ड्रोन दमदार कामगिरी करतो. यटरिंग म्युनिशन वेपनच्या कॅटेगरीमध्ये असलेला ड्रोन हवेतील टारगेटवर योग्य निशाना करतो. टारगेट म्हणून ड्रोन त्यावर क्रॅश होतो. ज्यामुळं दुश्मन पूर्णपणे उद्धवस्त होतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे जवानांचा जीव धोक्यात न घालता दुश्मनांच्या लाँच पॅड किंवा कॅम्पवर हल्ला करतो.

नागास्त्र ड्रोन हा सायलेंट किलर आहे, या ड्रोनचा आवाज कमी येतो किंवा आवाज नसल्याबरोबर आहे. पॅराशूट रिकव्हरी मॅकेनिझ्म हे देखील वैशिष्ट्य आहे. मिशनवर असताना तांत्रिक अडचण आल्यास  पॅराशूटमुळं त्यातील स्फोटक परत मिळवता येतात, त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो.  भारतीय सेनादलाकडून 480 नागास्त्र ड्रोन बनवण्याची ऑर्डर या दिली होती. त्यापैकी भारतीय सैन्य दलाला गेल्या वर्षी 120 ड्रोन देण्यात आले होते.  नागास्त्र ड्रोनची मारक क्षमता 100 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. याशिवाय 4500 मीटर उंचीपर्यंत ड्रोन जाऊ शकतो. याचं वजन 2 किलो इतकं आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.