- rat१७p२.jpg-
25N64450
संगमेश्वर ः गडनदीमधील गाळ उपशाची सुरुवात करताना ग्रामस्थ.
---
आरवली गडनदीमधील गाळ उपशाला सुरुवात
पुरापासून होणार सुटका ; शेतीचे नुकसान होईल कमी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मधील गाळ उपसा करण्यास प्रारंभ झाला असून आरवली गावासहित जवळच्या गावांना बसणारा पुराचा फटका आता कमी होणार आहे.
आरवली गावचे सरपंच निलेश भुवड, माजी पंचायत समिती सदस्य नाना कांगणे, समीर पाटणकर, उमेश लघाटे, संजय लघाटे, ओंकार पाटणकर, बाबा लघाटे, प्रवीण साठे, महेश पाटणकर, संतोष रानडे, प्रसाद पाटणकर तसेच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. आरवलीमधील गडनदीला पुरामुळे गावाला मोठा पुराचा फटका बसत होता. याबाबत गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करत ही मागणी आमदार निकम यांनी पूर्ण केली आहे. गडनदीमधील पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा करण्यास गुरुवारी सुरुवात झाली. आरवली पुलाजवळील गाळ उपसा करण्यात येत आहे. आरवली पुलाकडून भुवडवाडीपर्यंत गाळ उपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे ब्राह्मणवाडी तसेच आरवली गावाला बसणारा पुराचा फटका कमी होणार आहे. तसेच शेतीचे होणारे नुकसान ही कमी होईल. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.