Deharji Dam : देहरजी प्रकल्प ८०% पूर्ण, वसई विरारकरणं मिळणार १९० एमएलडी पाणी
esakal May 18, 2025 04:45 AM

विरार : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे धारण आता ८०% पूर्ण झाले असून धरणातून वसई विरार महानगरपालिकेला १९० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाने पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे.कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केआयडीसी व एममएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारानुसार एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. केआयडीसीने २७ जुलै, २००६ रोजी मे. पीव्हीआर प्रोजेक्ट्स लि. यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आणि या धरणाद्वारे व्यापक पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
  • देहरजी नदीवर माती आणि दगडांचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित धरणाची एकूण साठवणूक क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे.

  • वापरण्यास उपलब्ध साठवण क्षमता: ९३.५५ दशलक्ष घनमीटर (२५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन).

  • धरणाची लांबी: २४५० मीटर; उंची: ७१.६० मीटर.

  • धरणाचा प्रकार: गेटेड स्पिलवे असलेले मातीचे धरण.

  • स्पिलवे गेट्सचा आकार : १२ मीटर x ६.५ मीटर (४ गेट्स).

प्रकल्पाची सद्यस्थिती
  • मे, २०२५ मध्ये देहरजी मध्यम प्रकल्प सुमारे ८०% पूर्ण झाला आहे.

  • २०२७ च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

    प्रकल्पाचे फायदे
  • देहरजी धरणामुळे ९३.५५ दशलक्ष घनमीटर (प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर) पाण्याची साठवण क्षमता उपलब्ध होईल. यापैकी :

  • वसई-विरार महानगरपालिकेसाठी १९० एमएलडी पाणी राखीव आहे

  • पाणी पुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी १५ एमएलडी पाणी.

  • सिडको पालघर क्षेत्रासाठी ५० एमएलडी.

पाणी वापराची प्रस्तावित क्षेत्रे
  • वसई-विरार महानगरपालिका

  • सिडको

  • पालघर जिल्हा परिषद

देहरजी मध्यम प्रकल्प हा मूलभूत पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या आणि राज्यात दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या अजेंड्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. शाश्वत, उच्च-क्षमता असलेल्या या धरणामुळे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी थेट मदत होईल आणि पालघर तसेच आजुबाजूच्या भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. हा महत्त्वाचा उपक्रम वेळेवर आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि केआयडीसी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे मी कौतुक करतो."*

देवेंद्र फडणवीस ,मुख्यमंत्री

देहरजी मध्यम प्रकल्प हा जलसुरक्षा वाढवण्याच्या आणि ग्रामीण पायाभूत सुविधा भक्कम करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या व्यापक दृष्टिकोनातील एक प्रमुख उपक्रम आहे. एमएमआरडीए आणि केआयडीसी यांच्यातील धोरणात्मक सहयोगातून दीर्घकालिक, शाश्वत पिण्याचे पाणी पुरवठा उपाययोजना राबविण्याची आमची बांधिलकी अधोरेखित होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वसई-विरार आणि आसपासच्या भागांमधील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्यामुळे या भागातील जीवनमानातही लक्षणीय सुधारणा होईल आणि संपूर्ण भागातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.*

एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.