Mahad ST Bus Accident: वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले अन्...; विन्हेरे-पुणे एसटी बसला अपघात, महाडजवळील घटना
Saam TV May 18, 2025 06:45 AM

रायगड येथे बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 17 प्रवास जखमी झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. बसचा अपघात होताच लोकांनी आपल्या गाड्या थांबवून मदतकार्य सुरू केले आणि लोकांना रुग्णालयात दाखल केले. हा अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

विन्हेरे येथून पुण्याकडे निघालेली करंजाडी येथील बौद्धवाडी परिसरातील वळणावर या बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत 17 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही बस रस्त्यामध्ये पलटली. हा अपघात झाल्यानंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. जखमी प्रवाशांना तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सुदैवाने या अपघातात मोठी हानी टळली आहे.

दोन महिन्यापूर्वी असाच बसचा अपघात झाला होता.

महाड तालुक्यातील वरंध विभागात रामदास पठार गावातून महाड कडे 15 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारसस एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने पलटी झाल्याची घटना घडली होती. ही घटना वरंध घाटातील बेबीचा गोल येथे घडली होती. एसटी सुमारे 50 फुट खाली पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.

त्यावेळी या अपघाताचे वृत्त समजताच मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली होती. मात्र रायगड जिल्ह्यात बस अपघाताच्या घटना या वारंवार घडत असल्याने याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.