पंचांग -
रविवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.४५, सूर्यास्त ७.०१, चंद्रोदय रात्री १२.०१, चंद्रास्त सकाळी १०.०८, भारतीय सौर वैशाख २८ शके १९४७.
दिनविशेष -
२००४ - पुण्याच्या कृत्तिका नाडीगने सरस प्रगत गुणांच्या आधारावर तानिया सचदेव आणि एन. राघवी यांना मागे टाकून मुलींच्या १९व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
२०१३ - भूषण हर्षे, आनंद माळी, गणेश मोरे या तीन गिर्यारोहकांनी ‘साउथ कोल’पासून चढाई करीत एव्हरेस्ट शिखर सर केले.
२०१५ - झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली.