बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे नेते मिथून चक्रवर्ती यांना बीएमसीने नोटीस जारी केली आहे. मुंबईतील घरावर बीएमसीने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. परंतु याबाबात अजून मिथून दा यांनी कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मिथून दा यांच्या मुंबईतील मालाड परिसरातील एका भूखंडाच्या तळमजल्याबाबत ही नोटीस दिली आहे.
पालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'मुंबईतील मालाड परिसरात मिथून चक्रवर्ती यांचा भूखंड आहे. एरंगल गावात एका भूखंडाच्या तळमजल्यावर परवानगीशिवाय बांधकाम केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे बांधकाम का पाडू नये? याचं स्पष्टीकरण मिथून चक्रवर्ती यांना द्यावं लागणार आहे. तसंच त्यांनी याबाबत कोणतही स्पष्टीकरण दिलं नाही. तर बेकायदेशीर बांधकाम म्हणून ते घर पाडण्यात येणार असल्याचा' इशाराही पालिकेने दिला आहे.
माहितीनुसार पालिकेने मालाड परिसरात 100 हून अधिक बेकायदेशीर बांधकाम शोधून काढले आहेत. त्यातील काही मोठे बंगले सुद्धा आहेत. जे बंगले चुकीच्या नकाशांच्या आधारे बांधले गेले आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत इमारती पाडण्याची बीएमसीची तयारी आहे.
मुंबई पालिकेने कलम 351 (1 अ) अंतर्गत मिथून दा यांना नोटीस बजावली आहे. यासाठी मिथून यांना एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. जर मिथून चक्रवर्ती यांनी नोटीसीबाबत स्पष्टीकरण दिली नाही तर त्यांचं बांधकाम पाडलं जाण्याची शक्यता आहे.