नेहल वढेरा आणि शशांक सिंह या जोडीने केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 200 पार मजल मारली आहे. पंजाबने राजस्थानसमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 219 रन्स केल्या. पंजाबकडून नेहल आणि शशांक या दोघांव्यितिरिक्त कर्णधार श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंह आणि अझमतुल्लाह ओमरझई या तिघांनीही छोटेखानी मात्र निर्णायक खेळी केली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. त्यानतंर आता पंजाबचे गोलंदाज 219 धावांचा यशस्वी बचाव करत राजस्थान विरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.