RR vs PBKS : पंजाब किंग्सचा आठवा विजय, राजस्थान रॉयल्सवर 10 धावांनी मात
GH News May 18, 2025 10:07 PM

पंजाबने किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सवर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात 10 धावांनी मात केली आहे. पंजाबने राजस्थानला 20 ओव्हरमध्ये विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानला पंजाबच्या गोलंदाजांसमोर 7 विकेट्स गमावून 209 धावाच करता आल्या. पंजाबने अशाप्रकारे हा सामना जिंकला. पंजाबचा हा या मोसमातील एकूण आठवा विजय ठरला. मात्र त्यानंतरही पंजाबची प्लेऑफची प्रतिक्षा कायम आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानचा हा दहावा पराभव ठरला.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानसाठी पहिल्या 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र त्यापैकी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच इतरांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही शेवटपर्यंत टिकून राहून टीमला विजय मिळवून देता आलं नाही. दिल्लीसाठी ध्रुव जुरेल याने 31 बॉलमध्ये 4 सिक्स 3 फोरसह 53 रन्स केल्या. ओपनर यशस्वी जयस्वाल याने 200 च्या स्ट्राईक रेटने 1 सिक्स आणि 9 फोरसह 25 बॉलमध्ये 50 रन्स केल्या.

युवा वैभव सूर्यवंशी याने 15 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 40 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन याने 20, रियान पराग 13 आणि शिमरॉन हेटमायर याने 11 धावांचं योगदान दिलं. वानिंदू हसरंगा याला भोपळाही फोडता आला नाही. तर शुबमन दुबे 7 आणि क्वेना माफाका 8 धावांवर नाबाद परतले. तर पंजाबसाठी हरप्रीत ब्रार याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या तर मार्का यान्सेन आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.