RR vs PBKS : 6,6,6,6,4,4,4,4, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची तोडफोड खेळी, पंजाब विरुद्ध मोठा कारनामा
GH News May 18, 2025 11:06 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात 14 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशी याने आपली छाप सोडली. वैभवने राजस्थान रॉयल्सने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि संधीचं सोनं केलं. वैभव कमी वयात आयपीएल स्पर्धेत अनेक विक्रम केले. वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय आहे. वैभवने यासारखे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वैभवने 18 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध वादळी खेळी केली. वैभवने पंजाब विरुद्ध 220 धावांचा पाठलाग करताना 40 धावा केल्या. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे वैभवने त्याच्या या खेळीत एकही एकेरी किंवा दुहेरी धाव घेतली नाही.

राजस्थानची अप्रतिम सुरुवात

वैभवने यशस्वी जयस्वाल याच्यासह 2.5 ओव्हरमध्ये अर्थात फक्त 17 चेंडूत फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. राजस्थानची ही या मोसमात वेगवान 50 धावा करण्याची दुसरी वेळ ठरली. तसेच या दरम्यान वैभव आणि यशस्वी या दोघांनीही पावरप्लेचा चांगला फायदा घेतला. वैभवने पावरप्लेमध्ये जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे दोघांकडून मोठ्या भागीदारीची आशा होती. मात्र आक्रमक सुरुवातीनंतर राजस्थानला पावरप्लेमध्येच मोठा आणि पहिला झटका लागला. त्यामुळे वैभवच्या या खेळीचा द एन्ड झाला.

वैभव सूर्यवंशी पाचव्या ओव्हरमधील शेवटच्या अर्थात सहाव्या बॉलवर आऊट झाला. हरप्रीत ब्रार याने वैभवला झेव्हीयर बार्टलेट याच्या हाती कॅच आऊट केलं. वैभवने 15 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह 266.67 च्या स्ट्राईक रेटने 40 रन्स केल्या.

वैभव सूर्यवंशीचा झंझावात

राजस्थानचा पराभव

दरम्यान 76 धावांच्या सलामी भागीदारीनंतरही राजस्थानला विजय मिळवता आला नाही. राजस्थानने 220 धावांचा अप्रतिम पाठलाग केला. मात्र शेवटच्या क्षणी राजस्थानचे प्रयत्न अपुरे पडले. राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 209 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थानसाठी ध्रुव जुरेल याने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल याने 50 रन्स केल्या. इतरांनाही आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्यांना राजस्थानला विजयी करता आलं नाही. राजस्थानचा हा या मोसमातील 10 वा पराभव ठरला.

वैभव सूर्यवंशीची आयपीएल कारकीर्द

दरम्यान वैभवने या मोसमातून आयपीएल पदार्पण केलं. वैभवने आतापर्यंत एकूण 6 सामन्यांमध्ये 32.50 च्या सरासरीने आणि 219.10 स्ट्राईक रेटने 1 शतकासह एकूण 195 धावा केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.