गुणाबाई गाडेकर यांचा स्मृतिदिन
esakal May 19, 2025 03:45 AM

गुणाबाई गाडेकर यांचा स्मृतिदिन
धारावी, ता. १८ मे (बातमीदार) : डॉ. आंबेडकर आणि सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या गुणाबाई गाडेकर यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (ता. १६) जय भवानी क्रीडा मंडळ, नवी चाळ येथील पटांगणात चर्मकार समूहातील लोकांसाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकरी चळवळीत चर्मकार समाजाचा सहभाग होता, हे अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व कवी विलास देवळीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर, गिरीराज शेरखाने, अलका साबळे यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांपैकी गोविंद भोईटे, छाया ढवळे, शंकर गोपीरळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात देवळीकर यांनी वक्त्यांना संत रोहिदास महाराज यांची पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे शेवटी गुणाबाई रामचंद्र गाडेकर व सावित्री बोराडे यांना सामुदायिक वंदन करून अभिवादन करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.