Aloo Snacks: सकाळी नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न सर्वांच्या घरी पडलेला असतो. तुम्ही बटाट्यापासून बटाटा वडा, टिक्की किंवा भजी यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असेल. पण तुम्ही कधी बटाटा बाकरवडी खाल्ली आहे का? नाही ना...बटाटा बाकरवडी बनवणे सोपे असून टेस्टी देखील आहे. घऱातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडेल. चला तर मग आज जाणून घेऊया बटाटा बाकरवडी कशी बनवायची आणि कोणते साहित्य लागते.
बटाट्याची बाकरवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्यपारीसाठी- 2 कप कणीक
तिखट
मीठ
आमचूर
धनेपूड
पाव चमचा हळद
सर्व चवीनुसार घाला
गरम तेलाचं मोहन 2 टेबलस्पून घालून घट्ट पीठ भिजवा.
सारणासाठी लागणारे साहित्यउकडलेल्या बटाट्याचा लगदा
धने-जिरेपूड
आमचूर
मीठ
तिखट
थोडी हळद
साखर
तीळ 1 टेबलस्पून
सुक्या खोबऱ्याचा बारीक कीस 2 टेबलस्पून
आलं व हिरवी मिरची वाटून 1 चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
सर्व एकत्र करून चटपटीत सारण बनवा.
बटाट्याची बाकरवडी बनवण्याची कृतीबटाट्याची बाकरवडी बनवण्यासाठी सर्वात आधी पातळ पोळ्या लाटा. एका पोळीवर सारण दाबून लावा. दुसरी पोळी वर ठेवा. पाणी लावून कडा चांगल्या चिकटवा. या पोळ्यांचा घट्ट रोल बनवा. अळूवडीप्रमाणे स्लाईस कापून सोनेरी रंगावर तळा. कोथिंबिरीच्या चटणीबरोबर घ्या.