तिरंगा रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद
esakal May 20, 2025 01:45 AM

- rat१९p१२.jpg-
P२५N६४८०१
दापोली ः तिरंगा रॅलीत सहभागी नागरिक.
---
दापोलीतील तिरंगा रॅली
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १९ ः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी शिवस्मारक, बाजारपेठेकडून तहसीलदार कार्यालय अशी तिरंगा रॅली काढण्यात आली.
दापोलीतील या रॅलीत सैनिकांच्या माता, पहलगाम हल्ला प्रत्यक्ष अनुभवणारे नागरिक, माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतमाता की जय, जय हिंद, भारतीय जवानांचा विजय असो, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅली तहसील कार्यालय येथे आल्यानंतर माजी सैनिक, सैनिक माता यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.