कमल हासन यांचा ठग लाइफ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चेन्नईमध्ये काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. परवा म्हणजेच १७ मे रोजी ठग लाइफ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ७० वर्षीय कमल हासन पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. या चित्रपटात मराठमोळ्या महेश मांजरेकर यांची झळकही दिसली.
दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या. सुप्रसिद्ध दिग्दर्शक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सिलांबरसन, त्रिशा कृष्णन, अभिरामी, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज असे दाक्षिणात्य कलाकार; सान्या मल्होत्रा, अली फजल, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ असे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार दिसणार आहेत.
ठग लाइफ या चित्रपटामध्ये यांच्यासह त्रिशा आणि अभिरामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कमल यांचा अभिरामीसोबतचा किसिंग सीन पाहायला मिळतो. तसेच त्रिशासोबतचा रोमँटिक- इंटिमेट सीनचा ट्रेलरमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्रिशाचे वय ४२ वर्ष तर अभिरामीचे वय ४१ वर्ष आहे. कमल हासन यांची लेक श्रृती हासन ३९ वर्षांची आहे. दोन्ही अभिनेत्रीआणि कमल यांच्या वयात २७-२८ वर्षाचा फरक आहे. एकाप्रकारे लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींशी कमल हासन रोमान्स करताना दिसले आहेत आणि याच गोष्टीमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
हा चित्रपट १९८७ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मणिरत्नम आणि कमल हासन पहिल्यांदा एकत्र आले होते. आता बऱ्याच वर्षांनी दोघे ठग लाइफच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. ठग लाइफ हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा पॅन इंडिया चित्रपट असणार आहे.