टेस्लाचा CFO कमावतोय सत्या नडेला आणि सुंदर पिचाईंपेक्षा जास्त पैसा, वैभव तनेजा कोण?
Marathi May 21, 2025 08:26 PM

मुंबई : प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर जात अनेक भारतीयांनी जगभरात डंका वाजवला आहे. त्यामध्ये अनेक मोठी नावे समोर येतात. आता त्या यादीत आणखी एका मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या नावाचा समावेश झाला आहे. वैभव तनेजा (Vaibhav Taneja) असं त्यांचं नाव असून त्यांनी या वर्षी कमाईच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला (Satya Nadella) आणि अल्फाबेटचे प्रमुख सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनाही मागे टाकले.

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेले आणि टेस्ला कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) वैभव तनेजा यांनी 2024 मध्ये 139.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 1,157 कोटी रुपये कमावले आहेत. हे उत्पन्न त्यांना मुख्यतः स्टॉक ऑप्शन्स आणि इक्विटी अवॉर्ड्समुळे मिळाले आहेत. 1999 पासून वैभव तनेजांनी त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली असून यशाची एकेक पायरी चढत ते टेस्लाच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदापर्यंत पोहोचले.

Property Of Vaibhav Taneja : वैभव तनेजांच्या कमाईचे तपशील

टेस्लाच्या वार्षिक अहवालानुसार, वैभव तनेजांची एकूण कमाई ही 139.5 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. त्यामध्ये 113 दशलक्ष डॉलर्स स्टॉक ऑप्शन्स आणि 26 दशलक्ष डॉलर्स स्टॉक अवॉर्ड्सचा समावेश होता. या पॅकेजमध्ये 400,000 डॉलर्सचे बेस सॅलरी देखील समाविष्ट होते. हे अवॉर्ड्स 2024 मध्ये मंजूर झाले आणि चार वर्षांच्या कालावधीत व्हेस्ट होणार आहेत. टेस्लाच्या शेअरची किंमत 2024 च्या शेवटी सुमारे 250 डॉलर्स इतकी होती. ती 2025 च्या मे महिन्यात 342 डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.

Who Is Vaibhav Taneja : कोण आहेत वैभव तनेजा?

शिक्षण: वैभव तनेजा हे चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी (B.Com) घेतली आहे .

1999 ते 2016 दरम्यान प्राइसवॉटरहाऊसकूपर्स (PwC) मध्ये भारत आणि अमेरिकेत सुमारे 17 वर्षे काम.

PwC आणि सोलारसिटीमध्ये काम केल्यामुळे त्यांना जागतिक वित्तीय धोरणे आणि व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान मिळाले आहे.

2016 मध्ये सोलारसिटी कॉर्पोरेशनमध्ये सामील झाले. या कंपनीचे टेस्लाने 2016 मध्ये अधिग्रहण केले.

2017 मध्ये टेस्लामध्ये सहाय्यक कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून काम सुरू.

2018 मध्ये कॉर्पोरेट कंट्रोलर आणि 2019 मध्ये मुख्य लेखा अधिकारी (CAO) म्हणून पदोन्नती.

2021 मध्ये टेस्लाच्या भारतीय उपकंपनी, टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदी नियुक्ती.

ऑगस्ट 2023 मध्ये टेस्लाचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.