Healthy Lifestyle: हृदय विकारापासून बचावासाठी ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर करा….
GH News May 23, 2025 12:44 AM

हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोक आपले प्राण गमावत आहेत . तरुण आणि निरोगी दिसणाऱ्या लोकांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ लागला आहे. त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जबडा-खांदा दुखणे, पाठदुखी अशी लक्षणे दिसून येतात. जर ही लक्षणे दिसली तर अजिबात उशीर करू नये. हृदयविकाराचा झटका का येतो? हृदयविकाराची दोन मुख्य कारणे आहेत, ज्यामध्ये वाढलेले एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि वाढलेले रक्तदाब यांचा समावेश आहे. जेव्हा कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये जमा होते आणि कधीकधी ते तुटून हृदयापर्यंत पोहोचते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करा.

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. उच्च रक्तदाबामुळे, शिरा आकुंचन पावतात आणि हृदयावर जास्त दाब पडू लागतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण डॉ. सलीम झैदी यांनी हृदय निरोगी ठेवण्याचे 3 मार्ग सुचवले आहेत. जे स्वयंपाकघरात असतात आणि हृदयविकार रोखू शकतात.

लसून – लसणामध्ये अ‍ॅलिसिन असते, जे रक्तदाब नियंत्रित करते. हे नसांना अडथळ्यांपासून वाचवते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूणची एक पाकळी चावून खा. यानंतर कोमट पाणी प्या. जर तुम्ही ते कच्चे खाऊ शकत नसाल, तर तुम्ही ते कोमट पाण्यासोबत पूरक म्हणून घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचे लोणचे व्हिनेगरसोबत खाऊ शकता.

जवसाच्या बिया – जवसाच्या बिया हृदयासाठी निरोगी असतात . त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. दररोज एक चमचा जवस पावडर दही, सूप किंवा सॅलडमध्ये घालून खा.

लिंबू पाणी – लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शिरा स्वच्छ करते आणि हृदयाची जळजळ कमी करते. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे सकाळी लवकर रिकाम्या पोटी प्या.

या उपायांसोबतच, दररोज 30 मिनिटे चालणे आणि निरोगी आहार घ्या. कारण ते तुमच्या हृदयासाठी खूप महत्वाचे आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी, तुमच्या दैनंदिन आहारात या स्वयंपाकघरातील उपायांचा समावेश करा. त्यासोबतच निरोगी शरीरासाठी योग्य व्यायाम आणि चालणे फायदेशीर ठरते. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित होण्यास मदत होते. त्यासोबतच हृदय निरोगी राहाण्यास मदत होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.