Gold Smuggling Case Involving Ranya Rao : अभिनेत्रीच्या सोने तस्करीच्या प्रकरणाने पुन्हा डोके वर काढलं असून यावेळी त्यामध्ये थेट गृहमंत्र्यांचेच नाव आल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्र्यांनीच गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढविणारे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. गृहमंत्र्यांनी अभिनेत्रीच्या लग्नात 40 लाखांचे गिफ्ट दिल्याबाबत केलेले त्यांचे विधान चर्चेत आले आहे.
त काही दिवसांपूर्वी सोने तस्करी प्रकरणात रन्या राव या अभिनेत्रीला अटक कऱण्यात आली होती. ती अजूनही तुरुंगातच आहे. ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यामध्ये आता गृहमंत्री जी. परमेश्वर यांचेही नाव समोर आले आहे. ईडीने त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये छापेमारी करत तपासाला वेग दिला आहे.
कडून या प्रकरणाचा तपास पीएमएलए कायद्यानुसार केला जात आहे. यामध्ये हवाला रॅकेटचा संशय ईडीला आहे. त्यांच्यामार्फत रन्या रावच्या खात्यांमध्ये बनावट देवाणघेवाण झाली होती. ईडीने दावा केला आहे की, एका शिक्षण ट्रस्टने कथितपणे प्रभावशाली व्यक्तीच्या सांगण्यानुसार रन्या रावचे 40 लाख रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिल भरले होते. या बिलाबाबत कोणताही वैध पुरावा ट्रस्टकडे नसल्याचा दावा ईडीने केला आहे.
डी. के. शिवकुमार यांचा दावाउपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी परमेश्वर यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी लग्नामध्ये गिफ्ट दिल्याबाबत भाष्य केले. मी आताच परमेश्वर यांच्याशी बोललो. एक लग्नसमारंभ होता. आम्ही अनेक संस्था चालवतो. आपल्या परिचयातील लोकांचा सन्मान म्हणून त्यांना गिफ्ट देत असतो. आम्ही एक. रुपया, 10 रुपये, 10 लाख रुपये, 5 लाख रुपये देतो. मला वाटते की, त्यांनी असेच गिफ्ट दिले असेल. हा विवाह होता, त्यामुळे त्यात काहीच चूकीचे नाही, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.
शिवकुमार यांच्या या विधानानुसार परमेश्वर यांनी रन्या रावच्या विवाहात 40 लाख रुपये गिफ्ट म्हणून दिल्याचा अर्थ निघतो. त्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला असून परमेश्वर यांनी त्यावर भाष्य करणे टाळले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत उत्तर देईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ईडीला पूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, रन्या राव हिला 3 मार्चला दुबईला जात असतानाच बेंगलुरू विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 12 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत 12 कोटी रुपयांहून अधिक आहे. सध्या रन्या ही याप्रकरणी तुरुंगातच आहे. ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास केला जात आहे.