Ranveer Singh : लांब केस, लांब दाढी अन् डोळ्याला गॉगल; 'धुरंधर'मधील रणवीर सिंहचा नवा लूक व्हायरल, पाहा VIDEO
Saam TV May 24, 2025 04:45 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह Ranveer Singh) सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'धुरंधर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रणवीर सिंहचा नवीन लूक पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' (Dhurandhar ) चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे. रणवीर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सिंह लांब केस , लांब दाढी आणि काळ्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तो रस्त्यावर त्याच्या एका खास स्टाइलमध्ये चालताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी त्यांच्या लूकचे कौतुक करत आहेत. तर काहीजण त्यांच्या चित्रपटाची वाट पाहत असल्याचे सांगत आहेत. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत यामी गौतम, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.

'' हा ॲक्शन चित्रपट आहे. यातील रणवीर सिंहचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. तसेच दुसऱ्या व्हायरल होणारा व्हिडीओमध्ये गाडीवर पांढऱ्या कपड्यांमध्ये अभिनेता बसलेला पाहायला मिळत आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हा व्हिडीओ डोंबिवलीमधील आहे. व्हायरल व्हिडीओ मोठागाव-माणकोली पूलवरचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे पुढचे शूटिंग अमृतसरमध्ये होणार आहे. हा फुल ॲक्शन ड्रामा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

रणवीर सिंहने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात नाही आली आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. कायम हे जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रणवीर सिंहच्या बाकी चित्रपटांसारखा हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करेल असे बोले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.