IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, पंत की गिल? कर्णधार कोण?
GH News May 24, 2025 06:07 PM

भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने संघ जाहीर केला आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी  पत्रकार परिषदेतून एक-एक करुन खेळाडूंची नावं सांगितली. मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात काही मिनिटं निवड समितीची बैठक पार पडली. त्यानंतर खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी 2 विकेटकीपर खेळाडूंना संधी दिलीय. तसेच 4 ऑलराउंडर आणि प्रत्येकी 6-6 गोलंदाज आणि फलंदाजांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिल याची निवड करण्यात आली आहे. शुबमनची रोहित शर्मा याच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहितने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने शुबमनला त्याच्या जागी संधी मिळाली आहे. तसेच निवड समितीने ऋषभ पंत याला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली आहे. तसेच करुण नायर याची 2017 नंतर भारतीय संघात कमॅबक झालं आहे. तसेच ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याचंही पुनरागमन झालं आहे.

फलंदाज : शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन आणि करुण नायर

विकेटकीपर : ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल

ऑलराउंडर : रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकुर, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.

गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, आकाश दीप आणि कुलदीप यादव.

चौथ्या स्थानी कोण खेळणार?

दरम्यान विराट कोहली यानेही कसोटी निवृत्तीमधून निवृत्ती घेतली. विराट चौथ्या स्थानी बॅटिंग करायचा.त्यामुळे आता विराटच्या जागी कोण खेळणार? हा देखील मोठा प्रश्न आहे. याबाबत आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “चौथ्या स्थानी कोण खेळणार? हे हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन गिल ठरवतील”, असं आगरकर यांनी म्हटलं.

इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स

दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, एजबस्टन, बर्मिंगघम

तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स, लंडन

चौथा सामना, 23 ते 27 जुलै, एमिरट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल, लंडन

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.