गावच्या मालका .........लोगो
(१८ मे पान ६)
एकदम कर्णकटू किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले अन् आम्हा साऱ्यांचीच भीतीने गाळण उडाली. जसे आम्ही स्तब्ध झालो तसे रडण्याचा, जोरात विव्हळण्याचा आवाज आणखीनच मोठा होऊ लागला. या पिंपळावर मुंजा आहे अन् शेजारील नदीकिनारी आसरा, गीरा आहे हे वर्षानुवर्षे अन् पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकलेले. तेव्हा आमची ठाम समजूत झाली की, छबिना उठलाय!! आमची काहीतरी चूक झाली म्हणून ही भुतावळ उठल्येय. माझ्याबरोबर असणारे जरा वयस्कर शिवा पाष्टे म्हणाले, व्हायकल उठल्येय आता सगल्यांना खाली उतरूंदे. बा xxदे xतं कालबं.
-rat२४p२.jpg-
25N65996
--अप्पा पाध्ये-गोळवलकर
----
काळंब अन् पिंपळावर
मुंजा, आसरा, गीरा
आपल्याकडे आजही मधाचे महत्व खूप आहे. देवाच्या पंचामृती पूजेपासून ते औषधापर्यंत मधाचा वापर होत आला आहे. हा मध मिळवण्यासाठी मोठा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. त्यात धोकाही मोठा असतो. उंच झाडावरून ते पोळे जाळून खाली घेण्यापर्यंतच नव्हे तर तो घरी आणल्यानंतरही एखादी मधमाशी चावतेच. मधाच्या पोळ्यांचे खूप प्रकार आहेत. त्यात सातेरू, पोयं, टाळ्यं अन् काळंबं असे प्रकार महत्वाचे. हंगामाप्रमाणे मधाची चव अन् रंग बदलतो जसे पावसाळ्यात कुडा फुलतो तर त्या कुड्याच्या फुलांमधून मधमाशांनी जमा केलेल्या मधाची चव थोडी कडवट असते. पूर्वी मोठ्या प्रमाणावर तीळशेती असे तर त्यापासून बनलेला मध पिवळाधम्मक अन् तिळाचा वास असणारा असे तर कारवीच्या फुलांचा मध स्फटिक शुभ्र असतो.
झालं काय, आमचा एक पिंपळ आहे शेकडो वर्षांपूर्वीचा. हा अगडबंब विस्तार आहे त्याचा. त्याच्या फांदीवर दरवर्षी मोठाले काळंबं बसायचे मग त्याची आठ-दहा दिवसांनी तपासणी व्हायची तज्ज्ञांकडून अर्थात् जमिनीवरून मग ते पोळे पक्व झाले की, नेहमीचे पोळे काढणारे निष्णात असणारे म्हादे अन् पाष्टे हे संध्याकाळी आमच्या घरी यायचे. दोरी, स्टीलच्या बादल्या, धुत्री (गवताची मशाल) वगैरे साहित्य घेऊन आमच्या काकांसह पिंपळाकडे निघायचे काका. ५ नारळ, उदबत्ती, डाळतांदूळ, उल्फा असे सारे साहित्यनिशी काका सज्ज असायचे. मीही लहान असूनही त्यांच्यासोबत जायचो.
तिथे गेल्यावर एका स्वच्छ कापडावर ते चार-पाच नारळ मांडण्यात येत अन् काका अन् मी उभे राहून ग्रामदेवता, स्थानदेवता, पिंपळावरील मुंजा, वारावावटुळ यांना जाबसाल करायचो. एका वर्षी मी एकटाच पाष्टे/म्हादे यांच्याबरोबर गेलो होतो. सारे सोपस्कार पूर्ण झाले. वेळ होती रात्री ७/८ वाजताची. पिंपळाखाली आमची नारळीपोफळींची बाग आहे. पिंपळाचा बुंध्याचा घेर मोठा असल्याने पिंपळाच्या बुंध्याजवळ असणाऱ्या कोकंबीच्या झाडावरून एकेक इसम साहित्यानिशी वर चढू लागला. पहिला इसम पिंपळाच्या फांदीवर पोचला तर बाकीचे उतरत्या भाजणीप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर असतानाच एकदम कर्णकटू किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले अन् आम्हा साऱ्यांचीच भीतीने गाळण उडाली. जसे आम्ही स्तब्ध झालो तसे रडण्याचा, जोरात विव्हळण्याचा आवाज आणखीनच मोठा होऊ लागला. या पिंपळावर मुंजा आहे अन् शेजारील नदीकिनारी आसरा, गीरा आहे हे वर्षानुवर्षे अन् पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकलेले. तेव्हा आमची ठाम समजूत झाली की, छबिना उठलाय!!
आमची काहीतरी चूक झाली म्हणून ही भुतावळ उठल्येय. माझ्याबरोबर असणारे जरा वयस्कर शिवा पाष्टे म्हणाले, व्हायकल उठल्येय आता सगल्यांना खाली उतरूंदे. बा xदे xतं कालबं; पण मी मागे हटणारा नव्हतो. नास्तिक जरी नसलो तरी अंधविश्वासूही नाही. त्यामुळे माझी शिकारी बॅटरी पेटवली अन् गर्जना केली की, कोण आहे ते रडणारं? हिंमत असली तर पुढे ये, तुझा वगमान केलेला आहे मग ही नाटकं कशाला? छे! आवाज आणखी वाढला. मग मीही संतापलो अन् ज्या बागेतून आवाज येत होता तिकडे बॅटरीचा झोत टाकला अन् दगड मारू लागलो अन् काय गंमत झाली, नारळीच्या झाडावरच्या झावळींच्या पोकळीत २५/३० केल्टी (माकडे) होती. त्यांच्या झोपेत आम्ही व्यत्यय आणला. त्यांची झोपमोड झाली म्हणून ती चित्रविचित्र अन् भयंकारी आवाज करत होती. सत्य उजेडात आल्यावर आम्ही सर्वांनी हुश्श केले अन् काळंबे काढले. जवळजवळ १२/१३ लिटर मध मिळाले; पण मी त्यावर दगडी न मारता परत आलो असतो तर पंचक्रोशीत या घटनेबाबत पाच-सात पिढ्या गजाली रंगल्या असत्या अन् भुतांना जोर चढला असता.
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)