मध्य प्रदेश लीगने आगामी हंगामासाठी 10 संघाच्या जर्सीचे केले अनावरण
GH News May 28, 2025 02:04 AM

मध्य प्रदेश लीग अर्थात एमपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. सिंधिया कप 2025 नावाने ही स्पर्धा भरवली जाते. यावेळी पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 12 जूनपासून 23 जूनपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. महिलांचा अंतिम सामना 23 जून, तर पुरुषांचा अंतिम सामना 24 जून रोजी होणार आहे. मध्य प्रदेश लीगने मंगळवारी एका समारंभात आगामी हंगामासाठी सर्व 10 फ्रँचायझी संघांच्या जर्सीचे अनावरण केले. हा हंगाम 12 जूनपासून ग्वाल्हेरमधील शंकरपूर येथील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. गेल्या वर्षीही एमपीएलचा पहिला हंगाम येथे खेळवण्यात आला होता. 12 जूनला दोन सामने असणार आहेत. पहिला सामना दुपारी 3 वाजता जबलपूर रॉयल लायन्स विरुद्ध भोपाळ लेपर्ड यांच्या होईल. तर दुसरा सामना ग्वालियर चित्ता विरुद्ध चंबल घरियाल्स यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित या स्पर्धेत यावेळी पुरुष संघांची संख्या 5 वरून 7 करण्यात आली आहे. यावेळी बुंदेलखंड आणि चंबळ भागातील संघ देखील स्पर्धेत सहभागी होतील. या हंगामात पहिल्यांदाच महिला क्रिकेट लीग आयोजित केली आहे. महिलांच्या स्पर्धेत तीन संघ सहभागी होतील, ज्यामध्ये भोपाळचा संघ समावेश आहे.या स्पर्धेपूर्वी या स्पर्धेत भाग घेतलेल्या संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. अनावरण समारंभात पुरुष आणि महिला संघांची जर्सी प्रदर्शित करण्यात आली. या जर्सी अनावर कार्यक्रमाला राज्यभरातील सर्व खेळाडू, संघ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

जर्सी अनावरण समारंभात बोलताना अध्यक्ष महानार्यमन सिंधिया म्हणाले, “जर्सी अनावरण एका रोमांचक हंगामाची सुरुवात आहे. पहिल्या हंगामातील प्रचंड यश आणि या हंगामातील उत्साह पाहता, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की मध्य प्रदेश लीग क्रिकेट प्रतिभेचा आणि प्रादेशिक अभिमानाचा उत्सव आहे. यावेळी आम्ही केवळ लीगचा विस्तार करत नाही तर महिला स्पर्धा देखील सुरू करत आहोत, जी आमची विचारसरणी आणि खेळाप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते.”

जीडीसीएचे अध्यक्ष प्रशांत मेहता म्हणाले, “आम्ही मध्य प्रदेश लीग सीझन 2 बद्दल खूप उत्सुक आहोत. संघाच्या जर्सी त्यांच्या भागाचे आणि उत्साहाचे प्रतिबिंब आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे वर्ष गेल्या हंगामासारखेच धमाकेदार असेल. आम्हाला आशा आहे की यावेळीही काही नवीन प्रतिभा शोधल्या जातील.”

पुरुष संघ: ग्वाल्हेर चित्ता, भोपाळ लिओपर्ड्स, जबलपूर रॉयल लायन्स, रेवा जग्वार्स, इंदूर पिंक पँथर्स, चंबळ घरियाल्स, बुंदेलखंड बुल्स.

महिला संघ: चंबळ घरियाल्स, भोपाळ वुल्व्हज, बुंदेलखंड बुल्स

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.