शेतकऱ्यांना पाऊस
थांबण्याची प्रतीक्षा
शाहूनगर ः परिसरात मॉन्सून पावसाने धुमाकूळ घातला असून, भात पेरण्या झाल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहावयास मिळत आहे. पावसामुळे सूर्यफूल व भुईमूग काढणीची कामे खोळंबली असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पाऊस थांबण्याची वाटप पाहत आहेत. सलग पडत असलेल्या पावसामुळे बहुतांशी भात पेरणी ठप्प झाली आहे. परिणामी खरीप हंगामातील भात, भुईमूग, नाचणी पेरणीचा हंगाम धोक्यात आला आहे. भात पेरणीची कामे ठप्प झाल्याने भात बियाणांची विक्री व खत विक्री थांबल्याने कृषी सेवा केंद्रचालकांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.