Maharashtra Live Updates :... तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये- कृषीमंत्री
Sarkarnama May 30, 2025 03:45 AM
MNS : मनसेची 'पुरुष आयोग' स्थापन करण्याची मागणी

मराठीच्या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आवाज उठवण्यात सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यात 'पुरुष आयोग' स्थापन करण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

Manikrao Kokate : ‘...तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये- कृषीमंत्री

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता आयएमडी आणि कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पाहावी, असे आवाहन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती रविवारी बैठक

नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज येथील कुंभमेळ्यानंतर आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ मध्ये नाशिक येथे होणार आहे. रविवार, १ जून रोजी यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवतील.

Naxalism in India : हिडमाला अटक

कुख्यात नक्षलवादी हिडमाला अटक करण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी त्यासाठी सहा कोटींचे बक्षिस जाहीर केले होते. अटक केल्यानंतर एके ४७ आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

Anil Kaspate Live : गाड्यांचा दावा चुकीचा

वकिलांनी हगवणे यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या असल्याचा दावाही अनिल कस्पटे यांनी खोडून काढला. त्यांच्याकडे आम्ही दिलेलीच गाडी आहे. त्यांच्याकडे आणखी एक गाडी असून ती गाडीही त्यांच्या नावावर नसल्याचे कस्पटे यांनी स्पष्ट केले. लग्नाआधी एमजी हेक्टर गाडी गाडी बुक करण्यात आली होती. पण त्यांनी धमकी देत फॉर्च्यूनर गाडी घ्यायला लावल्याचेही कस्पटे यांनी सांगितले.

Anil Kaspate News : प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी आरोप

प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी वकिलांकडून असे आरोप करण्यात आल्याचे अनिल कस्पटे यांनी सांगितले. त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. सप्टेंबर २००९ मध्ये वैष्णवीच्या पतीने मोबाईल मागितला होता. त्यानुसार १ लाख ५२ हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला होता. त्याचे हप्ते अजूनही फेडत असल्याची माहिती कस्पटे यांनी दिली.

Vaishnavi Hagawane Case : आरोप खोडून काढले

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कोर्टात आरोपींची बाजू मांडताना वकिलांनी गंभीर आरोप केले होते. वैष्णवीच्या चारित्र्यावर हगवणे कुटुंबाला संशय होता. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वकिलांनी केला होता. आपल्याकडे पाच कोटींच्या गाड्या असून त्यांना गाडी कशाला मागतील, असेही वकिलांनी म्हटले होते. हे दावे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी खोडून काढले आहेत.

India Defence Dudget : संशोधनासाठी दुप्पट खर्च

सीआयआय वार्षिक बिझनेस परिषदेत बोलताना डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी महत्वाची माहिती दिली. संरक्षण विभागासाठी संशोधन आणि विकासामध्ये अधिकाधिक गुंतवणूक व्हायला हवी. त्यासाठी सध्या संरक्षण विभागाचे बजेटमध्ये ५ टक्के तरतूद केली जाते. पण संरक्षणमंत्र्यांनी पुढील पाच वर्षांत हे बजेट १० टक्क्यांपर्यंत वाढविणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती कामत यांनी दिली.

फरार होणे निलेश चव्हाणला महागात पडणार; पुणे पोली मोठा दणका देण्याच्या तयारीत

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर वादात सापडलेला निलेश चव्हाण याला फरार होणे महागात पडणार आहे. पुणे पोलिसांनी चव्हाण याची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे.

कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात आंदोलन

कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. पाच कोटी रुपये खर्च करूनही गांधी मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे, असा आरोप करत याच पाण्यात आंदोलक बोटी सोडणार आहेत. तसेच क्षीरसागर यांचाही फोटो विसर्जित केला जाणार आहे.

Shivsena News: सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिंदे गटातील प्रवेश रखडला

काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश रखडला आहे. 31 मे रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तो आता 5 जून रोजी होणार आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दिली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

BJP News: पुण्यात भाजप आमदाराला धमकावलं

भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सहकारनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

Maratha On CBSE Board:विरोधात मराठा समाजाची आक्रमक भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सीबीएसई अभ्यासक्रमात केवळ एकच धडा आहे.या सापत्न वागणुकीविरोधात मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीबीएसई बोर्डाविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.पुण्यात मराठा संघटना आपली भूमिका मांडणार आहे.

Central Govt : ओळखपत्र देण्यापूर्वी डेटाबेस तपासा

भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाईचा जोर वाढला आहे. अशातच आता गृह मंत्रालयाने राज्य, केंद्र शासित प्रदेश यांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र तसेच रेशन कार्ड जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ओळखपत्र अथवा दस्तऐवज देण्यापूर्वी अर्जदाराचे नाव बेकायदेशीर स्थलांतरितांच्या डेटाबेसमध्ये आहे की नाही याची चौकशी करण्याचे आणि ते काटेकोरपणे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज मराठवाडा दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 750 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. येथील रामलीला मैदानावर फडवणीसांच्या उपस्थितीत महिला मेळावा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या बैठका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 3,4 आणि 5 जून रोजी मनसेच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत. या बैठकीत विविध विषयांच्या अभ्यासाठी पक्षांतर्गत ज्या समिती स्थापन केल्या होत्या त्या आपला अहवाल सादर करणार आहेत. आगाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे मनसैनिकांना काय सूचना करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis : फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे कौतुक केलं. ते म्हणाले, शरद पवारांच्या अनेक गोष्टी मला आवडतात. त्यांच्या काही गोष्टी मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करतात."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.