पुणे - विद्यार्थी व पालकांसाठी शिक्षण व भविष्यातील करिअरच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक ठरणारे सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मुख्य प्रायोजक ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, सहप्रायोजक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे, सहयोगी प्रायोजक शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव व एक्सलन्स सायन्स ॲकेडमी बारामती यांच्या सहकार्याने बारामतीतील सर्व मान्यवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २९) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
शुक्रवारी व शनिवारी (ता. ३०), असे दोन दिवस बारामतीतील सिटी इन चौकातील मुक्ताई लॉन्स येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थी व पालकांना या एक्स्पोला विनामूल्य भेट देता येईल.
करिअर व शैक्षणिक संधी याबाबत विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शनाची असलेली गरज लक्षात घेता या एक्स्पोचे आयोजन केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांपासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेस, केजी टू पीजी अभ्यासक्रम, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी व पालकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.
जेईई, नीट, सीईटी यासारख्या स्पर्धा परीक्षांबाबतही सर्व माहिती येथे उपलब्ध होईल. सर्व शैक्षणिक पर्याय एकाच दालनामध्ये उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यातील दुवा ठरणार आहे.
वेलणकर यांचे आज मार्गदर्शन
शिक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक प्रा. विवेक वेलणकर शुक्रवारी (ता. ३०) दुपारी बारा वाजता मुक्ताई लॉन्स येथे दहावी व बारावीनंतर करिअरची निवड’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.
दहावी- बारावीनंतर पालक व विद्यार्थ्यांनाही कोणते करिअर निवडावे, कोणत्या करिअरमध्ये अधिक चांगल्या संधी आहेत, याची पुरेशी माहिती नसते. या पार्श्वभूमीवर प्रा. वेलणकर या संदर्भातील महत्त्वाच्या टिप्स पालक व विद्यार्थ्यांना देणार आहेत. सेमिनारनंतर शंकानिरसनही केले जाईल. या सेमिनारसंदर्भात अधिक माहितीसाठी ९५१८७ ४९१९३ येथे संपर्क साधावा.
सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचा उपक्रम विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त आहे. एक्सलन्स सायन्स ॲकॅडमी गेल्या अकरा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच योग्य संस्कार देण्याचे कार्य करीत आहे. मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश या सूत्रामुळे आयआयटी- जेईई, नीट व सीईटी स्पर्धापरिक्षात विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवीत, देशातील नामांकित आयआयटी तसेच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला आहे. येणाऱ्या काळात बारामतीतून ॲाल इंडिया रॅंक एक नक्कीच मिळेल, असा विश्वास वाटतो.
- प्रा. गौरव गुंदेचा, संस्थापक, एक्सलन्स सायन्स ॲकॅडमी, बारामती
काय, कधी, केव्हा व कोठे
काय : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट प्रस्तुत सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो
कधी : ३० व ३१ मे २०२५
केव्हा : सकाळी दहा ते रात्री आठ
कोठे : मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक, बारामती.
माहितीसाठी संपर्क
दत्तात्रेय- ८९७५६७३३१०
रमेश- ८२०८५३९९४२