Sakal Vidya Education Expo : 'सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो' उद्यापासून चिंचवडमध्ये; नामवंत संस्थांचा सहभाग
esakal May 30, 2025 05:45 AM

पिंपरी - कुठल्या विद्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणत्या विद्या शाखेमधून करिअरसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का? मग, एम्पायर इस्टेट येथील रागा पॅलेसमध्ये ३१ मे आणि १ जून रोजी आयोजित ‘सकाळ’ विद्या एज्युकेशन एक्स्पोला नक्की भेट द्या. येथे एकाच छताखाली विद्यार्थ्यांना करिअरबाबत सर्व मार्गदर्शन मिळणार आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना वेध लागले आहेत ते महाविद्यालयीन शिक्षण आणि करिअरची दिशा ठरविण्याचे. मात्र, अशा वेळी उत्तम महाविद्यालय निवडण्यासाठी, करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते.

sakal vidya education expo chinchwad

हेच लक्षात घेऊन ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. करिअरबाबतचे सर्व मार्गदर्शन येथे एकाच छताखाली मिळणार आहे.

या प्रदर्शनासाठी पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी हे प्रायोजक, एमआयटी एसीएस एओई, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी पिंपरी हे सहप्रायोजक आहेत. या प्रदर्शनात पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती आणि मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

एकाच ठिकाणी महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध पर्यायांची सर्व माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, इंटिरियर डिझाइन यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन त्यात असणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था सहभागी असतील.

‘सकाळ’ गेल्या अनेक वर्षांपासून हजारो विद्यार्थी आणि पालकांसाठी दीपस्तंभ बनून उभे आहे. ‘सकाळ विद्या एक्सपो’च्या माध्यमातून एकावेळी शहरातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांना एका छताखाली एकत्रित आणण्याची किमया केवळ ‘सकाळ’च करू शकते. ‘सकाळ विद्या एक्सपो’मुळे लाखो विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडले आहे.

- डॉ. एल. आर. यादव, कुलपती, अलार्ड युनिव्हर्सिटी

‘सकाळ एज्युकेशन एक्स्पो’मध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध पर्याय व प्रवेश प्रक्रिया चर्चासत्र पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध होते. विविध कोर्सची एकाच ठिकाणी माहिती मिळते. या प्रदर्शनात प्रवेश प्रक्रियेविषयी पारदर्शकता असते.

- मनीष मुंदडा, संस्थापक, साईबालाजी एज्युकेशन सोसायटी

‘सकाळचा एज्युकेशन एक्स्पो’ हे शैक्षणिक प्रदर्शन पालकांसाठी दीपस्तंभासारखे आहे. येथे पालक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळते. ‘सकाळ’च्या हा उत्तम उपक्रम आहे. एकाच ठिकाणी शैक्षणिक संस्था व विद्यापीठांची ओळख होते. विविध अभ्यासक्रमाची माहिती मिळते.’’

- ज्ञानेश्वर दळवी, संस्थापक, साईसकल शिक्षण प्रसारक मंडळ

‘सकाळ’च्या या शैक्षणिक प्रदर्शनात पॅरामेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विविध शाखांची माहिती मिळते. अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि पालकांसाठी ‘सकाळ एज्युकेशन एक्स्पो’ उपयुक्त आहे. कोणते महाविद्यालये निवडावे?, कोणती शाखा निवडावी? त्यातूनच एकाच ठिकाणी करिअरचे अनेक पर्याय निवडण्यासाठी मदत होत आहे.

- संभाजी मालघे, प्राचार्य, इंद्रायणी विद्या मंदिर संस्था

एक्स्पोबाबत..

  • केव्हा - ३१ मे आणि १ जूनला

  • कुठे - रागा पॅलेस, चिंचवड-एम्पायर इस्टेट

  • कधी - सकाळी १० ते रात्री ८

अधिक माहितीसाठी संपर्क : शिवम साळुंके - ९३०७७१५९०३

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.