डबल धमाका, ११ व्यांदा बोनस शेअर्स देण्याची घोषणा, लाभांशही केला जाहीर
ET Marathi May 30, 2025 03:45 PM
मुंबई : वाहनांसाठी घटक बनवणाऱ्या संवर्धन मदरसन इंटरनॅशनलने जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीचे निकाल (Samvardhana Motherson q4 results) जाहीर करताना आपल्ल्या भागधारकांना दुहेरी खूशखबर दिली आहे. कंपनीने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. तसेच लाभांशही जाहीर केला आहे. तिमाहीत कंपनीने १०५०.५० कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. गेल्या वर्षीच्या १३७१.८२ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा आकडा २३.४ टक्के कमी आहे. बोनस शेअर्स संवर्धन मदरसनच्या संचालक मंडळाने २९ मे रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या चांगल्या निकालांनिमित्त १:२ च्या प्रमाणात बोनस शेअर्स (Samvardhana Motherson declared bonus shares) जारी करण्यास मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की शेअरहोल्डर्सना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक २ शेअर्समागे १ नवीन शेअर बोनस म्हणून मिळेल. बोनस शेअर्स २८ जुलै २०२५ पर्यंत दिले जातील. बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. संवर्धन मद्रासनने यापूर्वी १९९७, २०००, २००५, २००७, २०१२, २०१३, २०१५, २०१७, २०१८ आणि २०२२ मध्ये बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. अंतिम लाभांश मंजूरसंवर्धन मदरसन इंटरनॅशनलच्या बोर्डाने आर्थिक वर्ष २५ साठी प्रति शेअर ०.३५ रुपये अंतिम लाभांश (Samvardhana Motherson declared dividend) देण्याची शिफारस केली आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख २३ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. हा लाभांश कंपनीच्या २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल. अंतिम लाभांश मंजुरीनंतर ३० दिवसांच्या आत, म्हणजे २६ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल. यापूर्वी, संवर्धन मदरसनने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना प्रति शेअर ०.५० रुपये अंतरिम लाभांश दिला होता. एकत्रित महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल जवळपास ८ टक्क्यांनी वाढून २९,३१६.८३ कोटी रुपये झाला. मार्च २०२४ च्या तिमाहीत महसूल २७,०५८.२२ कोटी रुपये होता. आर्थिक वर्षातील नफासंपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कंपनीने ३,८०३.०२ कोटी रुपयांचा निव्वळ एकत्रित नफा नोंदवला. एक वर्षापूर्वी तो २,७१६.२० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २४ मध्ये ९८,६९१.७४ कोटी रुपयांच्या तुलनेत कामकाजातून एकत्रित महसूल ११३,६६२.५७ कोटी रुपयांवर पोहोचला. शेअर्स वाढलासंवर्धन मदरसन इंटरनॅशनलचे शेअर्स (Samvardhana Motherson share price) २९ मे रोजी बीएसईवर २ टक्क्यांहून अधिक वाढीसह १५२.१५ रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. शेअरची दर्शनी किंमत १ रुपये आहे. ३ महिन्यांत शेअर २८ टक्क्यांनी वाढला आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.