बारामती - ‘विद्यार्थी व पालक डोळ्यासमोर ठेवून सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचे आयोजन केले आहे. मुलांना दिशादर्शक असा हा उपक्रम असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी आवर्जून घ्यावा,’ असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले.
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मुख्य प्रायोजक ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, सहप्रायोजक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे, सहयोगी प्रायोजक शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव व एक्सलन्स सायन्स ॲकॅडमी, बारामती यांच्या सहकार्याने आयोजित सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचे शुक्रवारी (ता. ३०) मुक्ताई लॉन्समध्ये उद्घाटन झाले. त्या प्रसंगी बिरादार बोलत होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलिस निरिक्षक विलास नाळे, माळेगावचे अध्यक्ष केशवराव जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बारामतीचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा ज्योती लडकत, गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी, करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, हेमचंद्र शिंदे, आचार्य ॲकॅडमी संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर मुटकुळे, उद्योजक कौशल शहा (सराफ), प्रवीण आहुजा, नितीन भंडारी, अल्पा भंडारी, सकाळचे सहयोगी संपादक नीलेश शेंडे, जाहिरात विभागाचे सरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. प्रा. मनोज वाबळे यांनी सूत्रसंचालन केले.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सत्यम पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अविनाश ढमढेरे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. धनंजय ठोंबरे, प्राचार्य शैलेंद्रकुमार मुकणे, एक्सलेन्स सायन्स ॲकॅडमीचे संचालक गौरव गुंदेचा, चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी कटफळचे अध्यक्ष संग्राम मोकाशी व प्राचार्य डॉ. विनोद पवार, वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार दिवेकर, डॉ. शरद गाडेकर, डॉ. अमिता डोंगरे, डॉ. प्रवीण शितोळे, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट निगडीचे अभिजित अहिवळे, सागर देशपांडे, एम.आय.टी. विश्वप्रयाग विद्यापीठाचे डॉ. रत्नाकर साखरे, गणेश पाटील, डॉ. डी.वाय पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाच्या अपर्णा जगताप, नेहा पंडीत, प्रियांका टाकळे, तिरंगा कॉलेज ऑफ डिझाईन बारामतीचे रणजित शिंदे, प्राचार्य वैभव फाळके, ए.एस.एम. ग्रुप ऑफ इनस्टिटयूटचे प्रसाद कदम, भूषण जाधव, एम.आय.टी. आळंदी कॅंपसचे अमर मोरे, डॉ. राहुल खलाटे, डॉ. विल्यम्स, आचार्य अँकेडमीचे रोहित महाजन, बारामती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, अभिजित शितोळे, अमरता मंत्री, सविता शिंपले, नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशनचे डॉ. सुहास पाखरे, अजय लिमण, राम घुगे, ज्योतीचंद भाईचंद ग्रुप ऑफ एज्युकेशनचे कौशल शहा (सराफ), भाविक मोमाया, गुरुकुल विद्या मंदीर गोखळी इंदापूरचे उपाध्यक्ष भरत हरणावळ, फ्युएल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे डॉ. नीलेश लिंबोरे, श्रध्दा कदम, संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरचे रोहित पवार, कृष्णा आलदर, दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली भिगवणचे प्रा. बेडे, प्रा. सूळ, प्रा. ढगे, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणेचे केदार आयचित, अविनाश थोरात, शास्त्री ग्रुपचे एम. बाला, शीतल ताथरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावीनंतर कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया, मिळणारी शिष्यवृत्ती व उपलब्ध महाविद्यालये याबाबत माहिती मिळते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा आहे. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ घ्यावा, दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोली (ता.दौंड)चे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले.
प्रदर्शनामुळे विद्यार्थी व पालकांच्या माहितीत अधिकची भर पडत आहे. मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांची गरज आहे, सकाळने हा उपक्रम हाती घेतला ही बाब महत्त्वाची आहे. सर्वांनी याचा फायदा घ्यावा.
- केशवराव जगताप, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना
दरवर्षी सकाळच्या वतीने आयोजित केला जाणारा सकाळ एज्युकेशन एक्स्पोचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना एकाच दालनात विविध अभ्यासक्रमांच्या संधींची माहिती मिळते. विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी.
- ॲड. रितेश सावंत, पालक, बारामती.
स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांना एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती उपलब्ध करून देण्याचा सकाळचा उपक्रम प्रशंसनीय आहे, विद्यार्थ्यांनी येथे येत या दालनाला भेट देऊन माहिती घ्यायला हवी.
- पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका.