लक्ष्मण हॅकवरील अमोल मिटकरी: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यावरून आता आमदार मिटकरींनी लक्ष्मण हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे?, असा सवाल मिटकरी यांनी केलाय. 2014 च्या निवडणुकीत सांगोल्यातून लढतांना लक्ष्मण हाकेने एका वकिलाकडून पन्नास हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरींनी केलाय. लक्ष्मण हक्केंनी आपली औकात पहावी, नंतरच अजित पवारांवर (Ajit Pawar) बोलावं, असा टोला आमदार मिटकरींनी हाकेंना लगावलाय.
दरम्यान, निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होतीय. त्यावरून मिटकरींनी पडळकरांना महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांसारखं बोलू नका, असं सल्ला दिलाय. त्यांना महाविकास आघाडीकडून काही मिळालं का?, असं म्हटलं तर पडळकरांना वाईट वाटेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
‘लक्ष्मण हाकेला आतापर्यंत लढलेल्या निवडणुकांमध्ये किती मत मिळाली हे त्यांनं पाहावं. तुझ्याजवळ असलेली गाडी तू स्वतः घेतली की जनतेने दिली, हे तू खरं जनतेला सांगावं. 2014च्या निवडणुकीत त्याने निवडणूक लढण्यासाठी एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यावेळी तुला फक्त 527 मत विधानसभेत मिळाली होती.’ अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित दादांशी तुलना करताना आपली औकात लक्ष्मण हाकेने पहावी. त्याला जास्त भाव देण्याची गरज नाही. मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके तुझा ही खारीचा वाटा आहे. तू ओबीसीसाठी काय केलं ते जनतेला सांग? मी आमदार झाल्यावर माझ्या गावात माझी ग्रामपंचायत निवडून आणली. जिल्हा परिषदेत पराभूत झालो, तरी सन्मानजनक मते मिळवली. तुला आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत मिळून साडेसहा हजारावर मते मिळाली नाहीत. लक्ष्मण हाके भूंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात नक्कीच बोलेल. मी त्याच्या अंगावर त्याचे अंतर्वस्त्र पण शिल्लक ठेवणार नाही. तुला तुझ्या औकातीतच उत्तर द्यावे लागेल. संतांनी सांगितला आहे, व्हावे अधमाशी अधम. असे ही आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..