करुण नायर याला निवड समितीने टीम इंडियात 9 वर्षात कमबॅकची संधी दिली. निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी करुणचा समावेश केला. टीम इंडियाच्या या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघांतील पहिल्या अनऑफिशियल टेस्टमध्ये करुण नायर याने इतिहास घडवला आहे. करुण नायरने सामन्यातील दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावलं आहे. करुण नायर याने या द्विशतकासह इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये विराट कोहली याच्या जागी दावा ठोकला आहे.