मुंबई : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी (Vaishnavi Hagawane Suicide Case) हगवणे कुटुंबाशी आपला काही संबंध नसल्याचं सांगणाऱ्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर आता आणखी एक आरोप करण्यात येत आहे. वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत हा जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीने तयार केला होता आणि त्यासाठी कस्पटे कुटुंबीयांकडून त्यांनी 1 लाख 50 हजार रुपये स्वीकारल्याचं समोर आलं.
वैष्णवी हगवणेच्या लग्नात 1 लाख 50 हजारांचा रुखवत दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी अंजली दमानियांना दिली आहे. शशांक हगवणेची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनेच हा रुखवत बनवल्याचं कस्पस्टेंनी सांगितलं.
तुम्ही रुखवत बनवू नका तर आमच्या पाहुण्या सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या असं वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणेंनी कस्पटेंना सांगितलं होतं. त्यांच्या सांगण्यावरुनच सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आल्याचं कस्पटेंनी म्हटलं. दरम्यान या रुखवताचे 1 लाख रुपये चेक द्वारे तर 50 हजारांची रोख रक्कम दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं. वैष्णवीच्या आईच्या अकाउंटवरुन पेमेंट केल्याचं कस्पटेंनी यावेळी सांगितलं.
वैष्णवी हगवणे प्रकरण आयपीएस सुपेकर यांना चांगलचं भोवल्याचं दिसतंय. शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांची उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली आहे. त्या आधी जालिंदर सुपेकर हे विशेष पोलिस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची पदावनती उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आल्याच गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटलं. वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणेला बनावट कागदपत्रांच्या आधारे बंदुकीचा परवाना पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकरांमुळे मिळाला होता.
जालिंदर सुपेकर हे शशांक हगवणेचे मामा आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांचं नाव चर्चेत आले. त्याच पार्श्वभूमीवर सुपेकरांवर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पाळ सीमेवरून निलेशला अटक करण्यात आली होती. याला आता शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं हा निर्णय दिला.
नेपाळहून विमानाने निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलिस शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता पुण्यात दाखल झाले होते. गेली दहा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला. तीन राज्यातून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहचल्याची माहिती समोर आली. तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला होता. तिथेच त्याला अटक झाली.
अधिक पाहा..