Accident : टँकरचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार ठार
esakal June 03, 2025 04:45 AM

किल्लेधारूर - धारूर-केज ५४८ सी राष्ट्रीय मार्गावर टोलनाक्या जवळ इथेनॉल टँकर वाहनाचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन उपचारासाठी अंबाजोगाई येथे दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंगद लांडगे वय २७ राहणार पिसेगाव असे तरुणाचे नाव आहे.

धारूर येथे केज येथील दुकानावर काम करणारा मॅनेजर अंगद लांडगे दुकानाच्या उधारी वसुलीच्या कामासाठी धारूर येथे आले होते. परत जात असताना केज धारूर राष्ट्रीय मार्गावर टोल नाक्याजवळ अज्ञात कारने दुचाकी स्वराला धडक दिली.

या वेळी दुचाकीस्वार खाली पडल्यानंतर अंगावरूनचा इथेनॉल टँकरचे चाक अंगावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याला अंबाजोगाई ते उपचारासाठी नेण्यात आले उपचार चालू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

त्याला प्राथमिक उपचार केज प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविण्यात आले होते. विशेष या तरुणाचे मागील आठ दिवसाखाली लग्न झाले होते. संबंधित इथेनॉल टँकर धारूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.