Vastu Tips : रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे शुभ की अशुभ?
Marathi June 05, 2025 04:25 PM

अनेकदा रस्त्यावरून चालताना आपल्याला रस्त्यात पैसे पडलेले दिसतात. अशावेळी रस्त्यात पडलेले पैसे उचलण्याचा मोह आपल्याला काही आवरत नाही आणि आपण पैसे उचलून थेट आपल्या खिशात ठेवतो. काहीजण हे पैसे देवी लक्ष्मीचा आर्शिवाद म्हणून जपून ठेवतात तर काही खर्च करतात. काहींच्या मते, असे रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे योग्य नसते, अशाने अनेक समस्यांना आमंत्रण मिळते. तर काहीजण याला शुभ मानतात. पण, शेवटी प्रश्न एकच उरतो की, शास्त्रानुसार रस्त्यावर पडलेले पैसै उचलणे शुभ की अशुभ? आजच्या लेखात जाणून घेऊयात रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे शुभ की अशुभ,

पैसे दिसणे शुभ की अशुभ?

  • जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर एखादे नाणे किंवा पैंशाची नोट पडलेली दिसली तर लवकर नवीन काम तुम्हाला मिळणार आहे, असे सांगितले जाते. याचा अर्थ असा की, देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकरच प्रसन्न होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल.
  • असेही मानले जाते की, एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल आणि रस्त्यात पैसे पडलेले दिसल्यास हे लक्षण तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळण्याचे असते. एकदरंच, शास्त्रानुसार अचानक रस्त्यावर पैसे मिळणे हे चांगले लक्षण आहे.
  • कामावरून घरी येताना तुम्हाला जर नोट किंवा नाणे सापडले तर लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता सांगितली जाते.

पडलेले पैसे उचलावेत का नाही?

  • ज्योतिषशास्त्रानुसार कुठेही रस्त्यावर पडलेले पैसे स्वत: वापरण्यापेक्षा मंदिरात दान करणे योग्य मानले जाते. कारण ज्या व्यक्तीचे पैसे हरवले आहेत तिचे मन अस्थिर असते. त्यामुळे हे पैसे दान करणे योग्य मानले जाते.
  • तुम्ही रस्तात पडलेले पैसे एखाद्या गरजू व्यक्तीलाही देऊ शकता. यामुळे गरिबाचे आर्शिवाद मिळतील आणि देवी लक्ष्मी प्रसन्न राहील.

 

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.