चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या भीषण अपघातात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. छत्तीसगढच्या विलासपूर इथं हा अपघात झाला. इनोव्हा चालक १०० च्या स्पीडने गाडी चालवत होता आणि अचानक त्यानं गुटखा थुंकण्यासाठी दरावा उघडला. यामुळे गाडी उलटली आणि भीषण अपघात झाला.
अपघातात मृत्यू झालेल्या ३१ वर्षीय व्यापाऱ्याचं नाव जॅकी गेही असं आहे. ते चकरभाटा इथं कापड व्यापारी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा रस्त्यावर उलटल्यानंतर इतर दोन वाहनांना धडकली. यामुळे आणखी एक चालक गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी सांगितले की, जॅकी गेही रविवारी रात्री एका पार्टीला गेले होते. त्यांनी मित्राला रात्री दीड वाजता नेण्यासाठी बोलावलं होतं. आकाश हा पंकज छाब्रा यांच्यासोबत आला होता. आकाश गाडी चालवत होता तर पंकज पुढच्या सीटवर बसला होता. जॅकी मागे बसला होता.
विलासपूर रायपूर महामार्गावर आकाशने अचानक गुटखा थुकण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. यामुळे त्याचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकाला धडकून उलटली. धडक इतकी भीषण होती की गाडीतले लोक बाहेर फेकले गेले. यात जॅकी दुभाजकावरील लोखंडी अँगलला धडकला. यात त्याच्या छातीसह खांद्यावर गंभीर दुखापत झाली होती. जॅकीचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव अनोव्हा कार एका उभा असलेल्या कारला धकडल्यानंतर चार पाच वेळा उलटली. शेवटी एका आर्टिगा कारला धडकली. यात आर्टिगा कारच्या चालकाला दुखापत झालीय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवलं.