Dilipkumar Sananda: काँग्रेसला मोठा धक्का; विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय, माजी आमदार अजितदादांच्या गळाला
Sarkarnama June 05, 2025 07:45 PM

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे, चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटन वाढविण्यासाठी लढणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसचा 'हात'सोडला आहे.

सानंदा हे येत्या 12 जून रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सलग 3 टर्म काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झालेले सानंदा गेले अनेक महिने पक्षावर नाराज होते. शेवटी त्यांनी कंटाळून 31मे रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सदस्य पदाचा राजीनामा पाठवला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.