दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जातो. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पर्यावरण म्हणजे आपण ज्या नैसर्गिक वातावरणात राहतो तो संपूर्ण परिसर होय. यात सजीव आणि निर्जीव घटकांचा समावेश असतो. जसे की, हवा, पाणी, माती, झाडे, प्राणी आदी घटक. सध्या हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण झपाट्याने वाढत आहे, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जाणून घेणार आहोत की, प्रदूषित हवा आणि दूषित पाण्यामुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो.
दुष्परिणाम –
कसे टाळाल?
जागतिक पर्यावरण दिनाचा इतिहास –
पर्यावरण दिन साजरा करण्याचा पाया 1972 मध्ये घालण्यात आला आहे. पहिली पर्यावरण परिषद 5 जून 1972 रोजी झाली होती, ज्या जवळपास 119 देशांनी सहभाग नोंदवला होता. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्य महासभेने 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून घोषित करण्यात आला.
हेही पाहा –