सावधान! डायटींगमुळे येऊ शकतं डिप्रेशन
Marathi June 07, 2025 09:25 AM

स्थूलता हा जागतिक प्रश्न झाला असून बदलणाऱ्या लाईफस्टाईलमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वाढणाऱ्या वजनाचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या वजनामुळे बीपी, डायबिटीससारखे आजारही होत असल्याने डायटिंगने वजन कमी करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की एका सर्वेनुसार डाएटींगचा अतिरेक केल्यास डीप्रेशनचा धोका वाढतो. असा दावा एँड हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षण अहवालात करण्यात आलेला आहे.

या सर्वेनुसार डाएटींग म्हणजे शरीरातील वाढलेली अतिरिक्त कॅलरीज कमी करणे व त्यासाठी योग्य तो आहार प्रमाणात घेणे. पण काहीजण झटपट वजन कमी करण्याच्या नादात कमी प्रमाणात खाण्यास सुरूवात करतात. त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत असल्याने अशा व्यक्तींमध्ये डिप्रेशन म्हणजेच नैराश्याची लक्षणे दिसू लागतात.

एँड हेल्थ जर्नलमधील दाव्यानुसार डाएट पॅटर्न व त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील २८ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी लो कॅलरी डाएट फॉलो करणाऱ्यांमध्ये डिप्रेशनची तीव्र लक्षणे दिसून आली. त्यातही ज्या व्यक्ती डाएटमध्ये अतिरेक अल्ट्राप्रोसेस्ड फू्डस, रिफाइंड कार्बौहायड्रेट, सेचुरेटेड फॅट, प्रोसेस्ड मटन, आणि मीठ भरपूर असलेले डाएट फॉलो करतात त्यांच्यामध्ये डिप्रेशनचा धोका सर्वाधिक असल्याचे समोर आले तर ज्या व्यक्तीं मेडिटेरेनियम डाएट फॉलो करतात त्यांच्यात नैराश्याचा धोका कमी असल्याचे समोर आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.