दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोर्टाने बाईक राईडरला शिक्षा सुनावली आहे. २०१८ साली पणजीतून मडगावला जाताना ही घटना घडली होती. तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता. उत्तर गोवा कोर्टाने तरुणाला दहा रुपयांचा दंड ठोठावत कोणतीही मोठी शिक्षा देण्यास टाळले. अपघाताच्या वेळी तरुणाचे वय कमी (२१) असल्याने कोर्टाने हा निर्णय दिला दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आलेत.