आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जून 2025
esakal June 07, 2025 01:45 PM

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ५.४१, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय दुपारी ३.५२, चंद्रास्त पहाटे ३.१२, भागवत एकादशी, बकरी ईद, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४७.

दिनविशेष -

  • २०११ - क्यूबा येथील ‘गिराल्डो कार्डोवा कार्डिन’ आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मनप्रीतसिंगला ९१ किलो वजनी गटात रौप्यपदक.

  • २०१५ - बांगलादेश सरकारकडून देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘मुक्तिसंग्राम सन्मान’ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान.

  • २०१५ - टिंटू लुकाने चीन येथे झालेल्या २९व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावून भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.