मुक्ताईनगर येथे अवैध रित्या विमल विक्रीसाठी वाहतूक करणारी गाडी वर अन्न व औषध प्रशासन गुप्त वार्ता विभाग नाशिक यांची मुक्ताईनगर मध्ये धडक कारवाई माजी नगरसेवक सह 3 वेक्ती वर गुन्हा दाखल करत 14 लाख 16 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
Live : "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा" - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी“राज्य सरकारने नैतिक जबाबदारी घ्यावी. राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी क्षणभरही त्यांच्या पदावर राहू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी प्रतिक्रिया बंगळुरूमधील चेंगराचेंगरीनंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
Live : सत्यगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार..येवला तालुक्यातील सत्यगाव येथील रामदास वसंत सोनवणे या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ३ शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहे तर दोन शेळ्या बिबट्या घेऊन गेले आहे.
Bhusaval Live : भुसावळ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्नआज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणून जगभर साजरा केला जातो, भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करात साजरा करण्यात आला.
यावेळी अश्वारूढ पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने शिवरायांचा एकच जयघोष करण्यात आला
Live : नाशिकमध्ये वऱ्हाड्यांना घेऊन जाणार ट्रक पलटी, २० जण जखमीनाशिकच्या पिंपळगाव येथून लग्नाला जाणारा ट्रक कदवा येथील जाऊळके रस्त्यावर आक्रळे जवळ रस्त्यावर पलटी झाला असून यात 14 ते 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Live : अपहरण झालेला 3 वर्षांचा चिमुरडा पंधरा दिवसांनी सापडलालातूर शहरातील गुमास्ता कॉलनी येथील स्वरूप भीमाशंकर स्वामी हा तीन वर्षाचा चिमूरडा मागच्या पंधरा दिवसापासून बेपत्ता झाला होता. अखेर १५ दिवसानंतर हा चिमुरडा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांना रडताना आढळला.
Solapur Live: नवीन सभापती दिलीप माने यांची बाजार समितीत अचानक भेट; व्यापाऱ्यांना दिल्या कडक सूचनानूतन सभापती दिलीप माने यांनी आज पहाटे बाजार समितीला अचानकपणे भेट दिली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, वजन मापे योग्य ठेवा, अशा सूचना व्यापाऱ्यांना केल्या यावेळी त्यांनी भाजीपाला, फळे, फूल विभागास भेटी दिल्या.
Live: सर्वोच्च न्यायालयाकडून NEET-PG परीक्षा पुढे; ३ ऑगस्ट ही नवी तारीखसर्वोच्च न्यायालयाकडून NEET-PG परीक्षा पुढे; ३ ऑगस्ट ही नवी तारीख
Live: पंतप्रधान मोदींच्या हस्ते कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे कटरा आणि श्रीनगर दरम्यान अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटीचा शुभारंभ झाला.
Nashik Live : अवकाळी पावसामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक, धरणाच्या पाणीपातळीत वाढनाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी
- धरणात २५०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा
- मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्के अधिक पाणीसाठा
- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक, धरणाच्या पाणीपातळीत वाढ
- यंदा नाशिक विरुद्ध मराठवाडा पाण्याचा वाद टळण्याची चिन्हं
Live : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी बँकेची आज पुन्हा चौकशी होणारहगवणे माय-लेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय. पण या कटात बँकेच्या एजंटचा काय सहभाग आहे? हे निश्चित करण्यासाठी आज म्हाळुंगे पोलिसांनी संबंधित बँकेच्या प्रतिनिधींना चौकशीला बोलावलं आहे.
PM Modi Live Update: गेल्या ११ वर्षात तरुणांना सक्षम करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले - - पंतप्रधान नरेंद्र मोदीगेल्या ११ वर्षात तरुणांना सक्षम करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले आहेत असं सांगत नवं शिक्षण धोरण, कौशल्य विकास तसंच स्टार्ट-अप्सवर लक्ष केंद्रित केल्यानं आजची तरुणाई विकसित भारताच्या संकल्पात महत्त्वाचा भागीदार बनली - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
PM Modi Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब पुलाची पाहणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब पुलाची पाहणी केली. ते लवकरच या पुलाचे उद्घाटन करणार. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार ?ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
PM Modi Live Update: जगातील उंच चिनाब पुलाचे मोदींच्या हस्ते होणार लोकार्पणजगातील उंच चिनाब पुलाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
Live Update: शरद पवार घेणार उद्भव ठाकरेंची भेटशरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
Live Update: कॅफेत नाही मी राज ठाकरेंच्या घरी भेटायला जाईल- राऊतकॅफेत नाही तर राज ठाकरेंच्या घरी भेटायला जाणार आहे असे राऊत म्हणाले आहे.
Live Update: इयत्ता दुसरी ते बारावीचा अभ्यासक्रम बदलणारइयत्ता दुसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे.
Live Update: RBIकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपातRBIकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात.रेपो रेट ५.५ वर, रिझर्व्ह बँकेकडून दिलासा
Live Update: तुमचं होम, कार लोन होणार स्वस्तहोम लोन, कार लोन कमी होणार आहे.
Sikkim Live : सिक्कीममधील थेंग येथील आर्मी हॉस्पिटलजवळ भूस्खलनउत्तर सिक्कीममधील थेंग येथील आर्मी हॉस्पिटलजवळ काल रात्री भूस्खलन झाले. या घटनेत एका वाहनाचे नुकसान झाले आहे. तथापि, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai Live : ईडीचे मुंबईत अनेक ठिकाणी छापेमिठी नदी स्वच्छता घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाचा शाही सोहळाकोल्हापुरात 351 वा शिवराज्याभिषेक शाही सोहळा नवीन राजवाडा येथे जोरात साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराजे यांच्या हस्ते या सोहळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला असून कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाच्या या भव्य समारंभाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. रायगडावरही संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या मनात आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
मुक्ताई पालखीचे आज कोथळी येथून प्रस्थानसंत मुक्ताबाई पालखी सोहळा आज मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान करणार आहे. या वारकरी सोहळ्याला ३१८ वर्षांची परंपरा लाभलेली असून, या वर्षीही अनेक भाविक खान्देश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाडा येथून दिंड्यासह या पालखीमध्ये सहभागी होत आहेत. कोथळी गावात वारकरी हळूहळू दाखल होऊ लागले असून, सोहळ्यातील चांदीचा रथ ओढण्यासाठी मानाचा बैलजोडीचा सन्मान राजेश प्रकाश पाटील (नाचणखेडा, जि. बऱ्हाणपूर, म.प्र.) यांना देण्यात आला आहे. ही बैलजोडी मुक्ताईनगरात दाखल झाली आहे आणि भाविकांच्या श्रद्धेने हा सोहळा रंगणार आहे.
नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरूवातनागपूरमधील महाल येथील शिव तीर्थावर श्री शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्याला विधीवत्तेने सुरुवात झाली. शिवप्रेमींनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती केली. या वेळी राज्यभिषेक सोहळा केवळ नृत्य किंवा संगीताने नव्हे तर शिवचरित्राचे पारायण करून साजरा करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमात अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
विदर्भात मॅान्सून सक्रीय होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणारविदर्भात मॅान्सून सक्रीय होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये १३ ते १४ जूनला मॅान्सून सक्रीय होईल, तर पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये १७ ते २० जूनपर्यंत मॅान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मॅान्सून २८ मे रोजी गडचिरोलीत पोहोचला असला तरी तो आठ दिवसांपासून तिथेच स्थिरावलेला आहे. या दरम्यान, जिल्ह्यांमध्ये तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उकाड्याचा त्रास सुरू राहणार आहे. त्यामुळे लोकांना आणखी काही दिवस उकाड्याला सहन करावे लागेल.
Nagpur Live: सुनिता जामगडे प्रकरणातील कारगिल पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियाभारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली सुनिता जामगडे यांच्याविरुद्ध कारगिल पोलिसांनी विशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्रोडक्शन वॉरंट न मिळाल्याने कारगिल पोलिसांनी आवश्यक तपासासाठी आणि पुनर्रिक्रीएशनसाठी नागपूरमध्ये सुनिताला आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सध्या सुनिता नागपूर मधील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे आणि कारगिल पोलिसांनी पुढील आठवड्यात स्थानिक न्यायालयाचा वॉरंट घेऊन नागपूर न्यायालयात पुन्हा अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुनिताचा नागपूर कारागृहातील मुक्काम अधिक काळ टिकण्याची शक्यता वाढली आहे.