Badshah: भारतीय रॅपर बदशाह ने नुकत्याच एका चाहत्याच्या ट्विटर प्रश्नावर दिलेला खुलासा सोशल मिडीयावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी एक चाहत्याने विचारलं की तो दुआ लीपासोबत संगीत सहकार्य करणार आहे का, त्या वेळी बदशाहने "I’d rather make babies with her, bro" असं उत्तर दिलं . या विधानाने सोशल मिडीयावर प्रचंड खळबळ उडाली; काहींनी या उत्तराला हसण्यावारी घेतल आहे. तर, काहींना या उत्तराला चीप असे म्हटले आहेत.
त्यानंतर ने सोशल मिडीयावर लगेचच स्पष्टीकरण दिलं त्याने लिहीलं की, "I think one of the most beautiful compliments that you could give to a woman that you really admire is to wish for her to mother your children. Meri soch nahi tumhari soch…" या स्पष्टीकरणाने त्याने हे विधान एक 'प्रशंसा-पुर्ण' कौतुक म्हणून म्हटलं, आणि जर काहींना हे बेजबाबदार वाटलं तर ते त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून आहे, असं त्याने स्पष्ट केलं. पण काहींनी याला सारवासारव करत असल्याचे म्हटले आहे.
या वादामुळे वर वेगळीच चर्चा रंगली आहे. काहींनी बदशाहचा प्रत्युत्तर समजून घेतला आणि त्याला 'कॉम्प्लिमेंट' म्हटले, तर काहीजणाने हे एक "explicit sexual harassment" मानलं . रेडीटवर देखील या विषयावर रंगीत चर्चा आहे.
दरम्यान, बदशाहचा फॅमिली बॅकग्राऊंडही चर्चेत आला,त्याला एक मुलगी आहे आणि तो पूर्वी विवाहित होता. यामुळं, त्याच्या या अगदी खुले विधानामुळे आणखी चर्चा वाढली आहे . बदशाह सध्या ‘The Unfinished Tour’ अंतर्गत अमेरिका दौऱ्यावर आहे. त्यामुळेच त्याचा हा सोशल मीडिया स्टेटमेंट त्याच्या संगीत आणि व्यक्तिमत्वाबद्दल नव्या आणि काहीसं वादग्रस्त दृष्टिकोनात येतो. पुढे काय रंगत आहे, ते पाहणं महत्वाचं ठरेल.