Historical research: गणेश खुटवड यांना 'तरुण इतिहास संशोधक' पुरस्कार जाहिर
esakal June 30, 2025 06:45 AM

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे गणेश खुटवड या तरुणाची 'तरुण इतिहास संशोधक' या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मंडळाच्या लेखन परंपरेच्या इतिहासावर संशोधन,  दहावीपर्यंतच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकांवर संशोधन करण्याबरोबरच त्याने मोडी लिपीचे शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सखोल अभ्यास करणारी संस्था म्हणून भारत इतिहास संशोधक मंडळाची संपूर्ण भारतभर ख्याती आहे. या संस्थेने महाराजांच्या इतिहासावर जेवढी पुस्तके प्रकाशित केली आहे त्याच्या निम्मी पुस्तके सुद्धा इतर कोणत्याही संस्थेने प्रकाशित केलेली नाहीत. या संस्थेला ७ जुलैला ११५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हा पुरस्कार दिला जात आहे. महाराष्ट्रातील तरुण वर्गाने इतिहास संशोधनाकडे वळावे या हेतूने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Premium| India's First Marathi Engineering College: मराठीतून इंजिनिअरींग करून प्रथमेशला मिळालंय १० लाखाचं पॅकेज! या नव्या प्रयोगाबद्दल जाणून घेऊ...

गणेश खुटवड हा महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त मोडी अभ्यासक आहे. तो महाराष्ट्र पुराभिलेख संचालनालयाच्या मोडी परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्याने अखिल भारतीय वर्णाश्रम स्वराज्य संघा विषयी संशोधन केले आहे. ‘भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहास लेखनातील प्रवाह’ या विषयावर संशोधन आहे. त्याचबरोबर दहावीपर्यंतच्या इतिहास पाठ्यपुस्तकांचा त्याने चिकित्सक अभ्यास केला आहे.

पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगणे, शिवाजी महाराजांविषयी व्याख्याने करणे, इतिहासासंबंधी ई कंटेंट निर्माण करणे, झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेणे असे इतिहासासंबंधी विविध उपक्रम तो करत असतो. हा पुरस्कार मला इतिहास संशोधनात काम करण्यासाठी नवी उर्जा देईल असं तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Sakal News (@sakalmedia)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.