तगडी स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल 5' (Housefull 5) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) , रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर आणि श्रेयस तळपदे , संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार पाहायला मिळत आहेत. यांच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहेत.
' 5' 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपटाने दोन दिवसांत 50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपट लवकरच 100 कोटींचा व्यवसाय करणार आहे. चित्रपटाचे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन जाणून घेऊयात.
'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 3दिवस पहिला - 24 कोटी रुपये
दिवस दुसरा - 31 रुपये
तिसरा दिवस - 32 कोटी रुपये
एकूण - 87 कोटी रुपये
अक्षय कुमारने हटके स्टाइलमध्ये 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे लोकांकडून रिव्यू घेतले आहेत. अक्षय कुमार चेहऱ्याला किलर मास्क लावून वांद्रे येथील थिएटरबाहेर येणाऱ्या प्रेक्षकांना 'हाऊसफुल 5' चित्रपट कसा वाटला? आणि चित्रपटात कोणाची भूमिका आवडली? हे प्रश्न विचारले. प्रेक्षकांकडून "चित्रपट खूप चांगला", "चित्रपट आम्हाला खूप आवडला", "चित्रपट बेस्ट होता", "सर्वच कलाकारांनी चांगल काम केले" अशा प्रतिक्रिया येत होत्या. अक्षय कुमारने चेहऱ्याला मास्क लावल्यामुळे तेथे त्याला कोणीही ओळखू शकले नाही.