जून महिना सुरू झाला असून अद्यापही हवा तसा पाऊस पडायला सुरूवात झाली नाही. पण, असे असले तरी कधी मुसळधार पाऊस सुरू होईल हे सांगता येणार नाही. मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर रस्त्याने चालणे जसे कठीण होते तसेच स्कुटी किंवा बाईक चालवताना अनेक अडचणी येतात. आपण अनेकदा असे अपघात पाहतो, जे खड्यांमुळे झालेले असतात. त्यात रस्त्यावर पाऊस आणि तेल साचल्यामुळे रस्ता निसरडा होतो. ज्यामुळे अपघात होतात आणि अनेकजण जीवाल मुकतात. त्यामुळे पावसात स्कुटी किंवा बाईक चालवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित होईल. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात पावसात स्कुटी किंवा बाईक सुरक्षितपणे कशी चालवायची
हेल्मेट –
हेल्मटचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. पण, तुम्ही कायम चांगल्या दर्जाचे हेल्मेट वापरायला हवे. पावसात हेल्मेट वापरण्याचा दुसरा फायदा म्हणजे पावसात हेल्मेट न घातल्यास रस्त्यावरील वाहतूक नीट दिसत नाही. पण, जेव्हा तुम्ही हेल्मेट घालता तेव्हा काचांमुळे दिसण्यात अडचण येत नाही.
टायर्स –
पावसात बाईक किंवा स्कुटी नेण्यापूर्वी टायर तपासायला विसरू नये. कारण जर गाडीच्या टायरची पकड जीर्ण झाली असे तर गाडी सहज घसरू शकते आणि तुमचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे पावसात गाडी चालवण्याआधी टायर नक्की पाहावा.
गाडीचा वेग मंद असावा-
पावसात स्कुटी किंवा बाईक चालवताना गाडीचा वेग कमी असावा. जेणेकरून गाडीवर तुमचे नियंत्रण राहील. जर गाडीचा वेग कमी असेल तर तत्काळ ब्रेक लावून तुम्ही वाहन थांबवू शकता. बऱ्याचदा भरधाव वेगात ब्रेक लावल्याने वाहन घसरण्याची भीती असते.
सुरक्षित फरक –
अनेकदा महामार्गावर जाताना आजूबाजूस मोठेमोठे ट्रक, टँकर असतात. अशावेळी आपले वाहन आणि ही अवजड वाहने यात सुरक्षित अंतर ठेवा.
जास्त पाण्यात गाडी चालवू नका –
रस्तांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडतात आणि पावसाळ्यात अनेकदा मुंबईतील रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे वाहन चालवताना पाण्याने भरलेले खड्डा किती खोल आहे याचा अंदाज बांधणे कठीण होते. त्यामुळे जर रस्त्यावर पाणी साचले असेल तर अशा ठिकाणी गाडी चालवणे टाळा.
ब्रेकचा वापर –
पावसाळ्यात मागील ब्रेक लावणे केव्हाही उत्तम असते. यामुळे तुमची गाडी हळूहळू थांबते. समोरचा ब्रेक लावल्याने गाडी अचानक थांबते. अशा वेळी तुमची गाडी घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात गाडी थांबवण्यासाठी मागील आणि पुढील ब्रेक एकसाथ लावा.
हेही पाहा –