श्री व्यंकटेश देवस्थान येथे तीन दिवसीय प्रतिष्ठा महोत्सव
esakal June 09, 2025 11:45 PM

श्री व्यंकटेश देवस्थान येथे तीनदिवसीय प्रतिष्ठा महोत्सव
मुलुंड, ता. ९ (बातमीदार) ः मुंबईतील फणसवाडी येथील श्री व्यंकटेश देवस्थान येथे गादी स्वामी श्रीनिवासचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांचा प्रतिष्ठा महोत्सव भव्य पद्धतीने पार पडला. दक्षिण भारतीय शैलीत नक्षत्र, वेद पठण, विधी आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. विशेष प्रतिष्ठा महोत्सवादरम्यान सकाळी आणि संध्याकाळी दिव्य आरती करण्यात आली. भाविकांना प्रसाद वाटण्यात आला. फणसवाडी येथील श्री व्यंकटेश देवस्थान हे मुंबईचे छोटे तिरुपती मानले जाते. देवस्थानचे विश्वस्त असलेले सोमाणी कुटुंब या वेळी आवर्जून उपस्थित होते. हजारो भाविकांनी धार्मिक उत्सवाला भेट दिली. मुंबई, राजस्थान व्यतिरिक्त, देशातील इतर राज्यांतील भाविकही या पवित्र धार्मिक उत्सवात श्री व्यंकटेश देवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. श्री व्यंकटेश देवांची या वेळी मिरवणूक काढण्यात आली आणि दररोज धार्मिक विधी करण्यात आला असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाचे अधिकारी सुरेश चौधरी यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.