छत्रपती शिवाजी महाराजांना महाआरतीद्वारे अभिवादन
esakal June 09, 2025 11:45 PM

छत्रपती शिवाजी महाराजांना महाआरतीद्वारे अभिवादन
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुंबईतील पहिल्या मंदिरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना महाआरती अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कुर्ला पश्चिमेतील संत गाडगे महाराज शाळेत हे ऐतिहासिक मंदिर माजी खासदार पूनम महाजन यांच्या पुढाकारातून साकारण्यात आले आहे. हा सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी माजी खासदार पूनम महाजन, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, मुंबई भाजपा प्रवक्ते उदय प्रताप सिंह, प्रकाश चौधरी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.