आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते आणि पदाधिकारी अॅक्शन मोडवर आले आहेत. पदाधिकाऱ्यांची करमाळा इथं बैठक होऊन, स्थानिकसाठी जोरदार तयारी करण्याचा निश्चय करण्यात आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या तयारी लागा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. आमदार नारायण पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.
Maharashtra State Road Transport : एसटी महामंडळाच्या जागांच्या खासगीकरणास विरोधराज्य परिवहन महामंडळाचे कर्जाच्या खाईत रुतलेले आर्थिक चाक बाहेर काढण्यासाठी मोठ्या शहरातील एसटी महामंडळाला मालकीच्या बस स्थानक आणि आगारांच्या जमिनीत खासगी व सार्वजनिक भागीदारातून विकसित करण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावाला एसटी कामगार संघटनांनी विरोध केला आहे. एसटी महामंडळावर सात हजार कोटी रुपयांची विविध प्रकारांची देणी आहेत.
Fixing Allegation Maharashtra Elections : राहुल गांधींची अधिकृत तक्रार किंवा पत्र नाही; निवडणूक आयोगाची भूमिकामहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये फिक्सिंग झाल्याच्या आरोपांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून अद्याप तक्रार किंवा भेटीसाठी वेळ मागितली नसल्याची तक्रार आलेली नाही, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. तर उत्तर देण्याचे टाळून निवडणूक आयोग आयोग आपली विश्वासार्हता गमावत असल्याचा पलटवार राहुल गांधी यांनी केला.
Akole Shivsena : अकोल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेतील वाद शिगेला; दोन गटाच्या वेगवेगळ्या बैठकाअकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह थांबायला तयार नाही. जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरीया गटाने मेळावा घेतला, तर आता दुसरे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले गटाने बैठक घेतली. बाजोरीया गटाच्या मेळाव्यात आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. हाच धागा घरत अकोला पश्चिम अकोला पूर्व दोन्ही विधानसभा क्षेत्रातील सर्व निवडणुकांमध्ये व संघटनात्मक बांधणी करतांना काम करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही, अशा शब्दात पिंजरकर-नवले गटाने स्पष्ट करत बाजोरीया गटावर पलटवार केला.
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलक; जमावबंदी अन् इंटरनेट सेवा बंदमैतई समाजाची संघटना असलेल्या अराम्बाई टेंगलच्या नेत्याला अटक झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसक आंदोलनाला पुन्हा सुरूवात झाली आहे. राज्य प्रशासनाने इम्फाळ खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जमावबंदीसह इंटरनेट सेवा देखीलबंद करण्यात आली आहे.
Amit Shah : तामिळनाडू अन् पश्चिम बंगाल पुढील वर्षी आमचेच सरकार; अमित शाह यांचा दावातामिळनाडू अन् पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला. तमिळनाडूमधील मदुराई इथं भाजप पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. तमिळनाडूमधील द्रमुकला सत्तेतून बाहेर घालवलं जाईल, असं इशारा अमित शाह यांनी दिला.
Harshwardhan Sapkal : निवडणूक अधिकाऱ्यांची 'नार्को टेस्ट' करा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणीमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची मिरची भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झोंबली आहे. त्यांचा खुलासा जनतेला भ्रमित करणारा आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.