Sonam Raghuvanshi Pregnancy Test : इंदूरमध्ये नुकत्याच घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अटकेत असलेली सोनम रघुवंशी, जी सुरुवातीला पीडित म्हणून समजली जात होती. मात्र, आता ती मुख्य आरोपीच्या भूमिकेत आली आहे. गाजीपूरमधून (Ghazipur) अटक केल्यानंतर तिच्या वैद्यकीय तपासणीत आणखी एक नवे वळण समोर आले आहे.
गर्भधारणा चाचणीने वाढवले गूढ९ जून २०२५ रोजी तीन महिला (Doctors) पथकानं सोनमची वैद्यकीय तपासणी केली. तिची प्रकृती कमकुवत होती आणि मानसिक स्थिती अस्थिर दिसून आली. सोनमच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. गर्भधारणा चाचणीचे निकालही स्पष्ट नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील सात दिवसांत अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे. जर सोनम गर्भवती असल्याचे सिद्ध झाले, तर सर्वांत मोठा हा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हे बाळ राजा रघुवंशीचं आहे, की प्रियकर राज कुशवाहाचं?
हनिमूनच्या निमित्ताने रचला हत्येचा कट?राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं ११ मे रोजी इंदूरमध्ये लग्न झालं होतं. २० मे रोजी ते हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले. २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाले आणि २ जून रोजी राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला. तपासात हे स्पष्ट झाले, की ही हत्या पूर्वनियोजित होती. पोलिसांच्या मते, 'सोनमने तिच्या प्रियकरासह कट रचून कॉन्ट्रॅक्ट किलरद्वारे राजा रघुवंशीची हत्या घडवून आणली.'
सोनमच्या वडिलांचं काय मत?मेघालय पोलिसांच्या तपासानुसार, सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह (जो तिच्या भावाच्या फर्ममध्ये अकाउंटंट होता.) यांनी एकत्रितपणे हा कट रचला. इतर चार जणांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र, सोनमचे वडील देवी सिंह यांनी हा आरोप फेटाळला असून CBI चौकशीची मागणी केली आहे.
सोनमची मानसिक स्थिती कशी आहे?सोनमने पोलिसांना सांगितले, की ती अपहरणाच्या घटनेनंतर गाजीपूरमध्ये कशी पोहोचली हे आठवत नाही. तिच्या मानसिक स्थितीचा विचार करून पोलिस तिची काळजीपूर्वक चौकशी करत आहेत. आता पुढील सात दिवसांत होणारा अल्ट्रासाऊंड या प्रकरणाला निर्णायक दिशा देऊ शकतो. सोनम गर्भवती असल्याचे सिद्ध झाल्यास, या प्रकरणाला वेगळं वळण लागणार हे मात्र स्पष्ट आहे.