महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदाणी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत आठव्या दिवशी अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत चिन्मयी बोरफळे(३-२२) हिने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह सुहानी कहांदळ नाबाद ४३ धावांच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघाचा ५ विकेट्स राखून पराभव करत आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर स्मॅशर्स संघाने पहिल्यांदा खेळताना २०षटकात ८बाद १०५ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये ईश्वरी अवसरे(१०), तेजल हसबनीस(०) हे फलंदाज गमावल्यामुळे सोलापूर स्मॅशर्स संघ ३बाद २२ अशा स्थितीत होता.
पण ईश्वरी सावकारने ४६ चेंडूत २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी करून संघाचा धावफलक हलता ठेवला. तिला दामिनी बनकर १७, शाल्मली क्षत्रिय १४ यांनी धावा काढून साथ दिली. पुणे वॉरियर्सकडून अनुजा पाटील(३-१५), चिन्मयी बोरफळे(३-२२) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून सोलापूर स्मॅशर्सला १०५ धावांवर रोखले.
या आव्हानाचा पाठलाग करताना ख़ुशी मुल्ला(८), अक्षया जाधव(०), श्वेता सावंत(४) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे पुणे वॉरियर्स संघ ३बाद १६ धावा अशा बिकट स्थितीत होता. सलामवीर सुहानी कहांदळने एकाबाजूने संघाची धुरा सांभाळताना ४३ चेंडूत ४९ धावांची संयमी खेळी केली. तिने ३चौकार मारले.
सुहानी व अनुजा पाटील(२२धावा) यांनीं चौथ्या विकेटठी ४९ चेंडूत ५४ धावाची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर सुहानीच्या साथीत श्वेता माने १०, उत्कर्षा कदम नाबाद १४ यांनी धावा काढून संघाला १८.३ षटकात ५बाद १०८धावा करून पूर्ण करून दिले. सोलापूर स्मॅशर्सच्या ईश्वरी सावकारने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक २४७ धावा करून ऑरेंज कॅपचा मान मिळवला.
संक्षिप्त धावफलकसोलापूर स्मॅशर्स: २०षटकात ८बाद १०५धावा(ईश्वरी सावकार ४४(४६,२x४,१x६), दामिनी बनकर १७, शाल्मली क्षत्रिय १४, ईश्वरी अवसरे १०, अनुजा पाटील ३-१५, चिन्मयी बोरफळे ३-२२, इशिता खळे १-११, ख़ुशी मुल्ला १-१४) पराभुत वि.पुणे वॉरियर्स: १८.३ षटकात ५बाद १०८धावा(सुहानी कहांदळ नाबाद ४३(४९,३x४), अनुजा पाटील २२(२४,३x४), श्वेता माने १०, उत्कर्षा कदम नाबाद १४, मुक्ता मगरे २-१८, आरती केदार २-१७, ईश्वरी अवसरे १-१५); सामनावीर - चिन्मयी बोरफळे.